शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्यापेक्षाही जास्त व्यवसाय परवान्याविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:15 IST

जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त अन्न पदार्थ व संबंधित वस्तू विकणाऱ्या व्यावसयिकांकडे परवाने किंवा नोंदी नसल्यची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देकारवाई होणार : अन्न व औषध प्रशासन विभागाची माहिती

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात निम्म्यापेक्षा जास्त अन्न पदार्थ व संबंधित वस्तू विकणाऱ्या व्यावसयिकांकडे परवाने किंवा नोंदी नसल्यची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच अनेकांच्या नोंदीची मुदत संपून देखील ते व्यवसाय करत आहेत. अशा सर्व विक्रेत्यांनी तात्काळ नोंदी करुन घ्याव्यात यासाठी अन्न व औषध प्रशासनाने सप्टेंबर महिना अखरेपर्यंत विशेष मोहिम राबवली आहे. त्यानंतर जर परवाने किंवा नोंदी नसतील तर धडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे परवानगी असणे तसेच नोंद असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील ५० टक्के व्यावसायिकांकडे परवानगी व नोंदी नसल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत विविध अन्न पदार्थ विक्री करणारे, किराणा माल, दारू विक्री, हॉटेल, मेस व इतर संबंधित व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाप्रमाणे नोंदी व परवाने घ्यावेत असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने करण्यात येते.अनेक व्यावसायिकांनी वार्षिक शुल्क भरावे लागू नये यासाठी उत्पन्न १२ लाखापेक्षा अधिक असून देखील परवाने घेतलेल नसून, फक्त नोंदणी करण्यात आली आहे. त्यांनी देखील रितसर आपल्या उत्पन्नप्रमाणे परवाने व नोंदणी करावी. यामध्ये छोट्या व्यावसायिकांनी २०० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी. १२ लाखाच्या पुढे उत्पादन असलेल्या व्यावसायिकांनी परवाना काढून घ्यावा. यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. त्याचा कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे.दुसºया टप्प्यात १ आॅक्टोबरपासून धडक कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यावेळी परवाना किंवा नोंदणी नसेल तर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नोंदणी व परवाना तात्काळ घ्यावा. १ आॅक्टोबरनंतर परवाना नसेल तर ५ लाख दंड व ६ महिने तुरुंगवास, तर नोंदणी केलेली नसेल तर १ लाख रुपये दंड आकारण्यात येईल.- कृष्णा दाभाडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग