बीड : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, ३१ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गेवराई तालुक्यातील तलवाडा मंडळात २३४ मिमी तर बीड तालुक्यातील पिंपळनेर मंडळात २१४ मिमी पाऊस झाला. त्या पाठोपाठ म्हाळस जवळा मंडळात १६६ पाऊस नोंदला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३९४ मिमी पाऊस अपेक्षित असताना ५७० मिमी पाऊस नोंदला आहे. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला असला, तरी बहुतांश ठिकाणी पिकांना अतिपावसाचा फटकाही बसला आहे. मंगळवारी मागील सकाळी ११ वाजेपर्यंत मागील २४ तासांत बीड तालुक्यात १०७.६ मिमी, पाटोदा ८६, गेवराई १०२, आष्टी ६९, माजलगाव ३९, केज ४३.६, अंबेजोगाई ८८, परळी ३२, धारूर ४३.८, वडवणी १०२ तर शिरूर तालुक्यात ७२ मिमी असा एकूण ७५.२ मिमी सरासरी पाऊस नोंदला आहे.
बीड जिल्ह्यात ३१ मंडळात ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST