शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

बीड शहरात ‘मडबाथ’चा वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:42 IST

मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठी निसर्गरम्य ठिकाणी नियोजन करत मडबाथचा आनंद निसर्गप्रेमींनी लुटला.

ठळक मुद्देनिसर्गाेपचार : निसर्गप्रेमींसह रोटरीच्या सदस्यांनी मनसोक्त केले मातीस्नान

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं ही प्रेरणा देणारी उक्ती सर्वश्रुत आहे. धकाधकीच्या जीवनात भौतिक सुखाचा आनंद घेणारे मातीपासून दूर जात आहेत. मात्र अलिकडच्या काळात निसर्गोपचाराचे महत्व पटू लागल्याने मडबाथचा ट्रेंड बीड परिसरात वाढू लागला आहे. शरीरशुद्धीसाठी निसर्गरम्य ठिकाणी नियोजन करत मडबाथचा आनंद निसर्गप्रेमींनी लुटला.आयुष्यभर निरोगी राहण्याचा राजमार्ग म्हणून निसर्ग उपचार मानला जातो. राष्टÑीय निसर्गोपचार दिनाचे आचित्य साधून मातीस्नानाचा आगळावेगळा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. बीडपासून जवळच बिंदूसरा प्रकल्पाजवळ हा कार्यक्रम पार पडला.या वेळी महिला, पुरूष, अबालवृद्ध, व्याधीग्रस्त व आजारी व्यक्ती उपस्थित होते. यावेळी योग व निसर्गोपचार तज्ज्ञ विनायक वझे, आयुषचे आनंदकुमार लिमकर यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. भारतीय प्राकृतिक चिकित्सा, माती लेप व माती स्नानाचे फायदे वझे यांनी पटवून दिले.मडथेरेपी करताना सांगण्यात आले आयुर्वेदाचे महत्वशेतातील चार फूट खोलपर्यंतची तसेच विविध नदी पात्रातील माती आणून यात मुल्तानी माती, चंदन पावडर, लिंबाचा अर्क असे मिश्रण तयार करण्यात आले. ते पाण्यात भिजवून अंगभर लेप लावण्यात आला.रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊनच्या वतीनेही क्लबच्या सदस्यांसाठी मडबाथचा उप्रकम राबविण्यात आला. श्रीक्षेत्र कपिलधार परिसरातील निसर्गरम्य वातावरणात मडथेरेपी करण्यात आली. प्राकृतिक चिकित्सा शोध, संशोधन, प्रसार अभियानांतर्गत गंगाजल रथयात्रा काढण्यात आली होती. यात अनेकांनी नोंदणी करुन मडथेरेपीचा आनंद लुटला.

टॅग्स :BeedबीडHealth Tipsहेल्थ टिप्स