शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘परिवर्तन’ घोटाळ््यातील संचालक मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:08 IST

परिवर्तन मल्टीस्टेट व परिवर्तन नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेविदारांना गंडा घालणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परिवर्तन मल्टीस्टेट व परिवर्तन नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो ठेविदारांना गंडा घालणाऱ्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, १८ महिने उलटून देखील यातील फक्त ६ जणांना अटक केली आहे. इतर आरोपी मोकाट असून त्यांना देखील तात्काळ अटक करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे.राज्यभरात परिवर्तन मल्टीस्टेट्या माध्यमातून ४ ते ५ हजार ठेविदारांकडून अधिकच्या व्याजदराचे अमिष दाखवून ३६ ते ४० कोटी रुपयांना गंडा घातला होता. ज्यावेळी ठेवीदारांनी पैशासाठी तगादा लावला त्यावेळी मुख्य संचालक अलझेंडे याच्यासह इतर संचालक मंडळातील सदस्यांनी पोबारा केला. त्यांच्याविरुद्ध माजलगावसह इतर ठिकाणी १८ महिन्यापुर्वी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर मुख्य संचालक विजय उर्फ भारत मरीबा अलझेंडे व संचालक मंडळातील इतर ३३ जणांपैकी ६ जण ताब्यात घेतले आहेत, त्यापैकी काही जणांना न्यायालयातून जामीन देखील मंजूर झाला. या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी नवीन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची भेट घेण्यासाठी सोमवारी ठेवीदार आले होते. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची भेट घेऊन आपले म्हणणे त्यांच्यापुढे मांडले. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी बैठकीत दिलेले आहेत. ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी यापुर्वी आंदोलन केले होते. पुढील काही दिवसात आरोपींना अटक केली नाही. तर १५ आॅगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.यावेळी दिपक हिवरेकर, विवेक उरने, बापूराव राजगुरु, प्रकाश ताटे, हसन स्यय्यद मुलानी शेख, रामचंद्र बोराडे, सुष्मा साळुंखे, अलका डहाके, गंगा ढोरमारे, प्रफुल्ल अग्रवाल यांच्यासह इतर ठेवीदार उपस्थित होते.व्यवस्थापकासह इतर तिघांचा मृत्यूठेवीदारांचे पैसे न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून येत असलेला दबावामुळे जामखेड येथील मल्टीस्टेटच्या व्यवस्थापकाचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने व इतर तीन ठेवीदारांचा देखील पैसे मिळणार नसल्याच्या तणावामुळे मृत्यू झाल्याची ठेवीदारांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :fraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूकCrime Newsगुन्हेगारी