शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 23:56 IST

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत.

ठळक मुद्देनागरिकांच्या सुविधेसाठी राबवली होती योजना : काहीजणांचा प्रतिसाद तर काही ठिकाणी ‘नॉट रिचेबल’

बीड : पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करत सुरु केलेली ही योजना संबंधित अधिकारी व विभागांनी फोल ठरवली असल्याचे दिसून येत आहे.एखाद्या अडचणीच्या वेळी तात्काळ पोलीस ठाण्यात किंवा संबंधित अधिकाºयांशी संपर्क करणे आवश्यक असते. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या-त्या हद्दीतील पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, सह.पोलीस निरीक्षक, दामिनी पथक, स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, यासह इतर अधिकाºयांना कायमस्वरुपी मोबाईल नंबर दिले होते.तसेच संबंधित पोलीस अधिकारी बदलून गेले तरी देखील संपर्कसाठी तोच मोबाईल क्रमांक कायम राहणार होता. त्यामुळे नागरिकांना संपर्क करणे सोईचे होणार होते या उद्देशाने शासनाच्या वतीने ही योजना राबवण्यात आली होती. परंतु अनेक ठिकाणी मोबाईल नंबर हे बंद करुन ठेवण्यात आले आहेत. तर काही जणांकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पुन्हा हे सर्व मोबाईल नंबर सुरु करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यासंदर्भात कोणी तक्रार केली तर संबंधितावर कारवाई करु.सहा उपविभागात काय आढळले ?जिल्ह्यात बीड, गेवराई, माजलगाव, अंबेजोगाई, केज, आष्टी हे सहा उपविभाग आहेत.आम्ही त्यांच्याशी शासकीय नंबरवर संपर्क केला, त्यापैकी बीड उपविपोअ यांचा फोन त्यांच्या अंगरक्षकाने उचलला. केजमध्ये स्वत: पोलीस उपाधीक्षक आमले यांनी फोन उचलला इतर ठिकाणी उप विभागीय पोलीस अधिकाºयांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’ आहेत.शहरातील सर्व ठाण्याचे प्रमुख पोनी व सपोनी यांनी कायमस्वरुपी असलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर प्रतिसाद दिला. तसेच इतर ठिकाणी ठाणे प्रमुखांनी प्रतिसाद दिला, काही ठिकाणी कॉल उचलले नाहीत.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMobileमोबाइल