शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या रस्त्यामुळे आमदार संतप्त; गुत्तेदार, अभियंत्यांना घडवली खड्डेमय मार्गावरून सफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 19:40 IST

‘आमच्या दररोजच्या हालअपेष्टा तुम्हीही अनुभवा..’ असे म्हणत अर्धवट रस्त्यावरून फिरवले

अंबाजोगाई (बीड) : केज मतदार संघातून जाणाऱ्या ५४८-ड या महामार्गाचे काम गुत्तेदाराच्या ढिसाळपणामुळे मागील २ वर्षापासून रखडल्यामुळे नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा सूचना देऊनही गुत्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने आ. नमिता मुंदडा यांनी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची सोमवारी (दि.०२) बैठक घेतली. बैठकीत गुत्तेदारास तिसऱ्या पट्टीत खडसावत आ. मुंदडा यांनी त्याच्याकडून निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करणार असल्याचे लेखी पत्र घेतले. त्यानंतर आम्ही मतदार संघातील नागरिक काय काय हालअपेष्टा सहन करतो ते एकदा तुम्हीही अनुभवा असे म्हणत गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फिरवले. 

केज मतदार संघातून अंबाजोगाईतील भगवानबाबा चौक ते मांजरसुंबा हा ८२ किमीचा ५४८-ड महामार्ग जातो. याचे काम कोरोनाच्या काळात रखडले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही गुत्तेदाराचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभाव यामुळे अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत गुत्तेदाराने रडत-पडत ९० टक्के काम पूर्ण केले आहे. मात्र, अंबाजोगाईतील रिंग रोड, येळंबघाट येथील पूल, पुलाच्या बाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मार्गातील गावांना जोडणारे ॲप्रोच रस्ते यांचे काम अर्धवट आहे. यामुळे खड्डे, धूळ याचा नागरिकांना प्रचंड त्रास आहे. अनेक अपघात झाले, जवळपास ३८ लोकांचे बळी गेले तरी कामाने वेग पकडला नाही. आ. मुंदडा यांनी आतापर्यंत चार वेळेस बैठक घेऊनही गुत्तेदराने काम त्वरित पूर्ण करण्याची केवळ पोकळ हमी दिली, काम केलेच नाही. अखेर, आ. मुंदडा यांनी सोमवारी गुत्तेदार आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, अभियंता यांची उपस्थिती होती. यावेळी महार्गाच्या अभियंत्यांनीही विलंबासाठी गुत्तेदारावर ठपका ठेवला. वेळोवेळी कामाचे देयके देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुत्तेदाराने या कामासाठीचे मनुष्यबळ दुसरीकडे स्थलांतरित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आ. मुंदडा यांनी गुत्तेदारास खडसावल्यानंतर त्याने अधिक लांबीचे काम, ॲप्रोच रस्तेचे काम ३१ मे पर्यंत, रस्त्याचे राहिलेले छोटे तुकडे ३० जूनपर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन दिले. 

रखडलेल्या रस्त्यावरून दुचाकी सफरदरम्यान, माझ्या मतदार संघातील नागरिकांना होणारा त्रास तुम्हीही अनुभवा असे म्हणत आ. मुंदडा यांनी गुत्तेदार आणि अभियंत्यांना अंबाजोगाईतील रिंग रोडने दुचाकीवरून फेरी मारण्यास भाग पाडले. खड्डे आणि धुळीच्या रस्त्याचे फेरी मारल्यानंतर गुत्तेदाराने दिलगिरी व्यक्त करत काम लवकर पूर्ण करण्याची हमी दिली.

टॅग्स :BeedबीडMLAआमदार