शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या ई- मेल आयडीचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 19:14 IST

Crime News Beed जिल्हा दंडाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक इ- मेल आयडीचा गैरवापर करुन मेल पाठवल्याचे समोर आले. 

ठळक मुद्देपाटोद्याच्या तहसीलदारांना पाठवला खोटा मेल 

बीड : जिल्हाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक ई- मेल आयडीचा गैरवापर करुन पाटोदा तहसील कार्यालयाला खोटा मेल पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाटोद्याच्या तहसीलदारांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ६६ (क) (ड) आयटी अ‍ॅक्टसह कलम ४१९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक ई- मेल आयडीचा गैरवापर करुन अज्ञात व्यक्तीने २४ सप्टेंबर रोजी पाटोदा तहसील कार्यालयाच्या मेल आयडीवर एक मेल पाठवला होता. या मेलमधील मेसेजच्या खाली फ्रॉम राहुल रेखावार (आयएएस कलेक्टर तथा डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट) असा मजकूर या मेलमध्ये होता. पाटोद्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शंका आल्याने त्यांनी याबाबत खात्री केली असता अज्ञात व्यक्तीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, बीड यांच्या वैयक्तिक इ- मेल आयडीचा गैरवापर करुन मेल पाठवल्याचे समोर आले. 

या प्रकरणात हा मेल पाठवणाऱ्या आरोपीच्या नावाची खात्री करण्याचा प्रयत्न झाला. मात्र संबंधिताचे नाव समोर आले नाही. अखेर तहसीलदार रमेश् मुंडलोड यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.  

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडInternetइंटरनेटcyber crimeसायबर क्राइम