अंबाजोगाई : लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या तरुणावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.अंबादास विठ्ठल चव्हाण (वय २०, रा. कुसळवाडी तांडा) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. अंबादासने त्याच्या गावातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवत मागील ७ महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिल्याने अंबादासचे कृष्णकृत्य चव्हाट्यावर आले. अखेर त्या अल्पवयीन पीडितेने बर्दापूर पोलीस ठाणे गाठून झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून अंबादास चव्हाण याच्यावर बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:04 IST
लग्नाचे आमिष दाखवून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सतत अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुसळवाडी तांडा येथे उघडकीस आली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
ठळक मुद्देपीडिता गर्भवती राहिल्याने कुकर्म उघड