शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना फिरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:21 IST

धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा असलेला आरक्षणाचा प्रश्न मागील चार वर्षांपासून रखडलेला असून शासन केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

ठळक मुद्देधनगर आरक्षण : माजलगावात महाएल्गार मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा असलेला आरक्षणाचा प्रश्न मागील चार वर्षांपासून रखडलेला असून शासन केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लावल्यास मंत्र्यांना  गावबंदी करणार असल्याचा इशारा राज्याचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला.येथील मोंढा मैदानावर आयोजित महाएल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उत्तमराव जानकर, शिवाजी राउत, कल्याण आबुज, डॉ. भगवान सरवदे, प्रकाश गवते, माधव निर्मळ, बंडु खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, आरक्षण हा धनगर समाजाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. हा प्रश्न केवळ धनगड व धनगर या एका शब्दामुळे प्रलंबित आहे. शिफारस पाठवून आरक्षण मिळत नसून शासनाने परिपत्रक काढण्याची गरज आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे याकरीता राज्यभर वणवा पेटला आहे. चार वर्षे झाले तरी आरक्षणावर हे सरकार काहीच बोलत नाही. दोन महिन्यात एसटीचे प्रमाणपत्र न दिल्यास मंत्र्यांना राज्यभर गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यावेळी प्रा. प्रकाश गवते, कल्याण आबुज, माधव निर्मळ, बंडु खांडेकर, प्रा. चामनर यांनी भाषणे केली. जिल्ह्यातून समाज बांधव बहुसंख्येने मेळाव्यास उपस्थित होते.आरक्षणप्रश्नी सरकार निरुत्तर - उत्तम जानकरयावेळी बोलतांना उत्तम जानकर म्हणाले, निवडणूकीपूर्वी आरक्षण घेतल्याशिवाय या सरकारला सोडणार नाहीत.आरक्षणप्रश्नी सरकार निरूत्तर आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्यास राज्यभर आंदोलन उभा करणार आहे.मराठवाड्यातून धनगर समाजाचे दोन खासदार होणार आहेत. समाज बांधवांनी एकत्रित येऊन आरक्षणप्रश्नी लढा उभरण्याची गरज असल्याचेही उत्तम जानकर यांनी सांगितले.

टॅग्स :Beedबीडreservationआरक्षणagitationआंदोलन