शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मारहाण भोवली; बीडमधील दोन पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबादला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 12:35 IST

बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली

ठळक मुद्दे सर्वसामान्यांच्या होत्या तक्रारी आ. संदीप क्षीरसागरांच्या पत्राची प्रशासनाने घेतली दखल

बीड : बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे आणि वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांच्या विरोधात व्यापारी, सर्वसामान्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. याप्रकरणी आ. संदीप क्षीरसागर आक्रमक झाले होते. याप्रश्नी आ. क्षीरसागर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या पत्राची दखल घेऊन बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे. 

बीडमध्ये 13 मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडलेली असतांना बीड शहर पोलीस ठाण्याचे पो.नि.वासुदेव मोरे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची खातर जमा न करता व्यापाऱ्यांना व ग्राहकांना मारहाण करून जबरदस्तीने बीड शहर पोलीस ठाण्यात नेले होते. यानंतर बीड शहरातील व्यापारी बांधवांनी आक्रमक भूमिका घेत विनाकारण त्रास देणाऱ्या पो.नि.वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे पो. नि तळेकर यांना निलंबित करावे अशी मागणी करून बेमुदत बंदची हाक दिली होती. 

या प्रश्नी आ.संदिप क्षीरसागर यांनी व्यापाऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगत विनाकारण व्यापाऱ्यांना, ग्राहकांना, नागरिकांना विनाकारण त्रास देवू नये, अशी कडक भूमिका घेतली होती.  आ. क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेचा चांगलाच दणका बसला आहे. येथील वाहतूक शाखेचा अतिरिक्त पदभार   पोनि पाटील ( पेठ बिड पोलीस ठाणे ) यांच्याकडे तर बीड शहरचा पदभार  - पोनि सुनील बिर्ला, (पोलीस ठाणे शिवाजीनगर) यांच्याकडे देण्यात आला आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांची औरंगाबाद येथें बदली केल्याने आ. संदीप क्षीरसागर, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे व जिल्हा प्रशासनाचे  बीड शहरातील व्यापारी संघटनानी  आभार मानले आहेत.

टॅग्स :TransferबदलीBeedबीडPoliceपोलिसSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर