शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

नरेंद्र मोदींच्या सभेतील भोजनाचे बिल पोलिसांनी थकवले; मेसचालकाचा आत्महत्येचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 16:44 IST

मोदींच्या सभेसाठी बंदोबस्तावरील पोलिसांच्या जेवणाची केली होती व्यवस्था 

ठळक मुद्दे विधानसभा निवडणुकी दरम्यान परळीत झाली होती मोदींची सभा  १० महिने होऊनदेखील भोजनाचे बिल मिळाले नाही.

परळी (जि. बीड) :  विधानसभा निवडणुकीनिमित्त परळीत बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसांच्या जेवणाचे बिल दहा महिन्यांपासून थकीत असल्याने मेसचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. हे बिल तात्काळ मिळावे, अशी मागणी  मेसचे चालक संजय रामलिंग स्वामी यांनी बीडच्या जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तात्काळ बिल न मिळाल्यास आत्महत्येचा इशारादेखील निवेदनाद्वारे दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत सभा झाली. त्यासाठी परळी शहरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला होता. या बंदोबस्तासाठी जिल्हा व बाहेरून  आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी  यांच्या ५ दिवसांच्या जेवणाची सोय  येथील विद्यानगरमधील मेसने केली होती.  अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक राहुल धस व पोनि. कदम यांनी हे कंत्राट दिले होते. त्यांच्या सांगण्यावरून मेसचालक संजय रामलिंग स्वामी यांनी १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवणाची सुविधा उपलब्ध केली. 

बिल २ लाख ६२ हजार रुपये जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांच्या कार्यालयात  दाखल करण्यात आले. मात्र,  १० महिने होऊनदेखील बिल मिळाले नाही. त्यासंदर्भात मेसचालक स्वामी म्हणाले, जेवणासाठी त्यावेळी  उधारीवर किराणा सामान घेऊन सर्व व्यवस्था केली होती. मार्चपासून लॉकडाऊनची  प्रक्रिया सुरू झाल्यामुळे माझी मेस बंद आहे. त्यामुळे व्यवसाय बंद आणि बिल थकले हे दुहेरी संकट आले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBeedबीडPoliceपोलिस