शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य अबाधित रहावे; संत वामन भाऊंच्या चरणी धनंजय मुंडेंची प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 13:32 IST

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी निमित्त धनंजय मुंडे यांच्या हस्ते पारंपारिक महापूजा करण्यात आली

पाटोदा (बीड) : श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ श्री वामन भाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित महापुजेस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आज उपस्थित राहिले. यावेळी आपल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा कायम अबाधित राहावा, अशी प्रार्थना गहिनीनाथ महाराज व संत वामन भाऊ यांच्या चरणी केली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. 

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे आज संत वामन भाऊ यांचा 49 वा पुण्यतिथी सोहळा साजरा केला जात आहे. मागील साधारण 20 ते 25 वर्षांपासून पुण्यतिथीच्या दिवशीच्या महापूजेचा मान धनंजय मुंडे यांना आहे. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे याही वर्षी धनंजय मुंडे हे पुण्यतिथीच्या आदल्या दिवशी रात्रीच गहिनीनाथ गड येथे दाखल झाले. पहाटेच्या विशेष महापूजेनंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची ऊर्जा मला गोरगरिबांची सेवा करण्याचे बळ देते, असेही धनंजय मुंडे म्हणाले. 

अन दोघांनीही एकमेकांना बांधला फेटादरम्यान, संत वामन भाऊ यांच्या समाधीची महापूजा पार पडल्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांनी वारकरी संप्रदायाची ओळख असलेला मानाचा फेटा धनंजय मुंडे यांना बांधला. तर गडाचे महंत म्हणून धनंजय मुंडे यांनी विठ्ठल महाराज शास्त्री यांनाही तसाच फेटा स्वतःच्या हाताने बांधला. यावेळी संत वामन भाऊ यांच्या नावाचा जयघोष उपस्थित भाविकांनी केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड