लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरात मटका सर्रास चालू आहे. या मटका पायी शेकडो कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
अगोदरच गोरगरीब जनता हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेली असताना मटक्याने चटका लावला आहे. घरातील काहीही विकून किंवा व्याजाने खासगी सावकारांचे पैसे घेऊन अनेकजण मटक्याचे आकडे लावीत आहेत. यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी परळीतील नागरिकांतून होत आहे.
वैद्यनाथ मंदिर परिसरातील गणपती मंदिर समोरच्या परिसरात नगरपालिकेच्या जागेत अनेक पानपटीचे गाडे आहेत. त्यापैकी दोन गाड्यात फक्त मटका घेतला जात आहे. मटका खेळण्यासाठी शहर व खेड्यापाड्यातील नागरिक येथे गर्दी करीत आहेत.
....
. परळी शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त असूनही अवैध धंद्यांना उत आलाय. मटका, जुगार जोरात चालू आहे. हातभट्टीची दारू विक्री होत आहे, मोबाईल चोरी, भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. अवैध धंद्यांमुळे गोरगरिबांचे संसार मात्र उद्ध्वस्त होत आहेत. बेरोजगारीमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत आहे.
-अश्विन मोगरकर, भाजपा कार्यकर्ता, परळी.
....
वैद्यनाथ मंदिर परिसर व गणेशपार सह परळी शहरात ज्या ठिकाणी मटका चालू असेल तेथे धाडी टाकून कारवाई करण्यात येईल. परळीतील मुख्य मटका बुकीस जेरबंद करण्यात येईल.
-हेमंत कदम, पोलीस निरीक्षक, परळी शहर पोलीस ठाणे.
...
....