शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बीड येथील पहिल्या वृक्षसंमेलनात भरगच्च कार्यक्रमांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 15:47 IST

वृक्षांच्या सान्निध्यात जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी होत आहे.

ठळक मुद्देजगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे व्याख्याने होणार आहेत. सुनंदाताई पवार यांचे व्याख्यान

बीड : पालवनजवळील उजाड डोंगररांगावर सह्याद्री देवराई प्रकल्प राबवण्यात आला आहे. याठिकाणी १ लाख ६७ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांच्या सान्निध्यात जगातील पहिले वृक्ष संमेलन १३ व १४ फेबु्रवारी रोजी होत आहे. या संमेलनास पर्यावरण आणि निसर्गप्रेमी असलेल्या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन सिने अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

संमेलनातून पर्यावरण, वृक्ष लागवड जनजागृती केली जाणार असल्याचे सयाजी शिंदे यांनी  पत्रपरिषदेत सांगितले. सह्याद्री देवराई व बीड वनविभागातर्फे होत असलेल्या जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात मान्यवरांचे व्याख्याने होणार आहेत. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वा. श्रीकांत इंगनहलीकर यांचे ‘दुर्मिळ वनस्पती’ या विषयावर तर १२.०५ वा. सी.बी. साळुंके हे ‘गवताळ परिसंस्था’  या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. १२.०५ वा. बसवंत दुमने यांचे ‘पर्यावरण खेळ’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी १.०१५ वा. नंदु तांबे हे ‘पक्षी झाडे सहसबंध’ या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. १:५० वा. दिनकर चौगुले हे ‘देवराई यशोगाथा’ या विषयावर बोलणार असून २:१५ वा. महेंद्र चौधरी ‘सुगंधी वनस्पतीची लागवड व तेल निर्मिती’ या विषयावर बोलणार आहे. दुपारी ३ वाजता पांडूरंग शितोळे हे शेंद्रीय शेती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर ३:३५ वाजता शेखर गायकवाड हे ‘झाडे लागवड व देवराई निर्मिती यशोगाथा’ यावर बोलणार आहेत. सायंकाळी ४:१० वा. पोपट रसाळ हे ‘वृक्ष बँकेची संकल्पना’ मांडणार आहेत.

१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संजय नरवटे हे ‘पीक व झाडांवरील रोग- किड व्यवस्थापन’ या विषयावर बोलणार आहेत. ११: ०५ वाजता जयसिंग पवार हे पाणी व्यवस्थापन या विषयावर विचार व्यक्त करणार आहेत. यानंतर सुहास वार्इंगनकर हे ‘दुर्मिळ फुपाखरू’ या विषवर मार्गदर्शन करणार आहेत. २ वा.रघुनाथ ढोले हे ‘रोपवाटिका’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. संमेलनास विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सुनंदाताई पवार यांचे व्याख्यानवृक्ष संमेलनात १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.५ वाजता आ. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या वृक्ष संमेलनात महिलांचा सहभाग या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. 

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडsayaji shindeसयाजी शिंदेforest departmentवनविभाग