शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीकडे; अहवालात काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 11:41 IST

आरोग्य विभागाने सोपविला आठ पानांचा अहवाल : डोळे जाळल्याच्या चर्चांवर अहवालात काय आहे नमूद?

बीड : मारहाण करून डोळे मेणबत्तीने जाळून काढले, फोडले अशा चर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पसरल्या होत्या; परंतु शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे झालेल्या अति रक्तस्रावाने हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. आठ पानांचा हा अहवाल मंगळवारी सीआयडीकडे आरोग्य विभागाने सुपुर्द केला आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. हे प्रकरण राज्यभर गाजले. देशमुख यांच्या अंगावर मारहाण झालेले काही कथित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक झाले. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात होती. आता देशमुख यांचा पीएम रिपोर्ट सीआयडीला दिला आहे. यात शरीराच्या वेगवेगळ्या भागावर मुकामार दिल्याने अति रक्तस्राव झाला. त्यात ते शॉकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, तसेच डोळे जाळले, काढल्याच्या चर्चांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दुजाेरा दिला नाही.

अहवालात काय म्हटले?संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे कारण 'हॅमरेज ॲण्ड शॉक ड्यू टू मल्टीपल इंन्ज्युरिज' असे नमूद केले आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार अनेक ठिकाणी मारहाण झाल्यामुळे रुग्ण शॉकमध्ये गेला आणि मृत्यू झाला, असा याचा अर्थ होतो.

मारहाणीमुळे डोळ्याचा भाग काळा-निळादेशमुख यांच्या छातीवर, पाठ, हात, पाय, चेहरा, डाेके यावर मुकामार होता. चेहऱ्यावर आणि त्यातही डोळ्यावर मारहाण झाल्याने खालचा व वरील भाग काळा-निळा झाला होता. हेच पाहून काही लोकांनी डोळे काढले, जाळल्याच्या चर्चा सुरू केल्या होत्या; परंतु यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना विचारणा केल्यावर त्यांनी याला दुजोरा दिला नाही.

तिघांच्या समितीने दिला अहवाल९ डिसेंबरला हत्या झाल्यानंतर समर्थकांसह नातेवाइकांनी आंदोलन केले. त्यामुळे १० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता शवविच्छेदन करण्यास सुरुवात झाली. साधारण तासभर ही प्रक्रिया चालली. डॉ.समाधान घुगे, डॉ.सुलतान हुसेन आणि डॉ.सचिन राऊत या तीन डॉक्टरांच्या समितीने शवविच्छेदन व अहवाल देण्याची प्रक्रिया पार पाडली. आता याचा व्हिसेरा राखीव ठेवला असून, त्याचा अहवाल येण्यास साधारण दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे.

शरद पवार मस्साजोगला येणारराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील मस्साजोगला येऊन मयत सरपंच देखमुख यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच आ. रोहित पवार यांनी मस्साजोगला भेट दिली होती.

चौथा आरोपी पकडलाया प्रकरणात जयराम माणिक चाटे (वय २१, रा. तांबवा, ता. केज), महेश सखाराम केदार (२१, रा. मैंदवाड, ता. धारूर), सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे (दोघे, रा. टाकळी, ता. केज), कृष्णा आंधळे (रा. मैंदवाडी, ता. धारूर), विष्णू चाटे, अशी आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील जयराम, महेश आणि प्रतीकला यापूर्वीच अटक केली होती. यातील चौथा आरोपी विष्णू चाटे याला बुधवारी सकाळी बीड शहराजवळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी