शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मस्साजाेग हत्या प्रकरण; दोषारोप पत्रातून सरपंच देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्याचे नाव वगळले

By सोमनाथ खताळ | Updated: March 1, 2025 14:46 IST

या सर्व हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह इतर दोन्ही गुन्ह्यांचे दोषारोपपत्र ‘सीआयडी’कडून न्यायालयात २७ फेब्रुवारी दाखल केले होते. हे दोषाराेपपत्र एक हजार पानांचे होते. यातून सरपंचाचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. त्याच्याविरोधात पुरावा आढळला नसल्याचा खुलासा सीआयडीने दोषारोपपत्रातून केला आहे. तर या सर्व हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाईंड असल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. तसेच याच गुन्ह्याच्या काही दिवस आगोदर ॲट्रॉसिटी व मारहाण आणि खंडणीचे गुन्हे घडले होते. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे होता. या गुन्ह्यांमध्ये वाल्मीक कराड याच्यासह नऊ जणांचा समावेश होता. यातील आठ आरोपी अटक असून, कृष्णा आंधळे हा घटनेपासून फरारच आहे. दरम्यान, सीआयडीने अनेक आरोप-प्रत्यारोप झालेल्या या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून २७ फेब्रुवारीला एक हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्य न्यायालयात दाखल केले होते. आता हे प्रकरण केज न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.

अशी आहेत आरोपींची नावेवाल्मीक कराड, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे व कृष्णा आंधळे, अशी आरोपींची नावे आतापर्यंत हत्या प्रकरणात होती. यातील कृष्णा वगळता सर्वच आरोपी अटक आहेत. दरम्यान, सिद्धार्थने लोकेशन दिल्याचा आरोप होता. सीआयडीने तपास केला असता त्याच्याविरोधात पुरावा आढळला नाही. त्यामुळे त्याच्यावर कोणताही आरोप ठेवला नाही. सध्या सिद्धार्थ हा न्यायालयीन कोठडीत असून लवकरच बाहेर येणार असल्याचे सांगण्यात आले.

कृष्णाच्या मागावर चार पथकेकृष्णा आंधळेला अटक करण्यासह इतर विविध नऊ मागण्यांसाठी देशमुख कुटुंब व मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन केले होते. हे आंदोलन सोडविताना पोलिसांनी कृष्णाच्या शोधासाठी चार पथके असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. यासह सीआयडीचे पथकेही मागावर आहेत. परंतु अद्यापतरी त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारी