शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 18:02 IST

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना बीड तालुक्यातील पिंंपळनेर व पाटोदा तालुक्यातील येथे घडल्या.

ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्या आहेत. 

बीड : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना बीड तालुक्यातील पिंंपळनेर व पाटोदा तालुक्यातील येथे घडल्या. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील विडा येथील अभिजित देशमुख या तरूणाने आरक्षणासाठी जीवन संपविले होते. आतापर्यंत जिल्ह्यात आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्या आहेत. 

शिवाजी तुकाराम काटे (४० रा.पिंपळनेर ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुळचे पिंपळनेर येथील रहिवाशी असलेले काटे हे पिंपळनेरपासून जवळच असलेल्या बेडूकवाडी शिवारात आपल्या भावाच्या शेतात राहत होते. त्यांना २० गुंठे जमीन आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते कुटूंबासह शेतात काम करीत होते. कुटूंबिय कामात व्यस्त असल्याचे पाहून काटे हे बाजूलाच असलेल्या तळ्याजवळ गेले. तेथील एका लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. हा प्रकार नातेवाईकांनी पाहिल्यावर त्यांना तात्काळ पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारीच अंत्यसंस्कारही करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील कानिफ दत्ता येवले (४५) यांनी शनिवारी दुपारी शेतात जाऊन विष प्राशन केले. हा प्रकार नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, कानिफ यांचे लहान भाऊ कल्याण यांनी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत जबाब दिला आहे. मुलींचे शिक्षण, लग्न बाकी आहे. त्यातच मराठा आरक्षण मिळत नसल्याने मुलांच्या भविष्याचे काय होईल, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी जीवन संपविल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.काय आहे चिठ्ठीतील मजकूर?शिवाजी काटे यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत ‘मराठा आरक्षणासाठी आज दि. ३ रोजी मी माझे जीवन संपवित आहे. महराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण द्यावे, एवढीच अंतीम इच्छा आहे’ असा मजकूर आढळला आहे. ही चिठ्ठी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाSuicideआत्महत्या