शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात ब्रेनडेड झालेल्या बाबूच्या अवयवदानामुळे अनेकांना पुनर्जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 13:07 IST

बाबू तरूण असल्याने त्याच्या शरीरातील सर्वच अवयव इतरांसाठी कामाचे ठरले.

ठळक मुद्देकुटुंबियांनी घेतला अवयवदानाचा धाडसी निर्णय

- अविनाश मुडेगांवकर 

अंबाजोगाई (जि. बीड) : पुनर्जन्म असतो की नाही, हे माहीत नाही. मात्र, पुनर्जन्म अवयवदानातून प्राप्त होतो. ही संकल्पना रुढ केलीय अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथील बाबू गोविंद ढवळे (२६) या तरुणाने. अपघातात बाबूचा मेंदू मृत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मोठ्या धाडसाने अवयवदानाचा निर्णय घेऊन अनेकांना पुनर्जन्म मिळवून दिला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील धसवाडी येथील बाबू गोविंद ढवळे हा पुणे येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत नोकरी करत होता. १४ फेब्रुवारी रोजी तो मित्रांसह कोल्हापूरकडे जात असतांना कार रस्ता दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला. यात जखमी झालेल्या बाबूला नरसापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली. तरीही त्याची हालचाल बंद पडली. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा मेंदू निकामी झाला. असून काही तासानंतर त्याचे निधन होईल असे सांगितले.

तरूण वयात कमावता मुलगा गमवावा लागतोय यामुळे ढवळे कुटुंबियांवर दु:खाचा  डोंगर कोसळला. त्याचवेळी बाबूचे मेव्हणे नामदेव माने व रवी भिसे यांनी अवयवदानाची संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. बाबूचे वडील गोविंद नरहरी ढवळे, आई जयश्री ढवळे, भाऊ अमोल ढवळे, यांनीही अवयवदानासाठी  संमती दिली. बाबु तर गेला, मात्र त्याच्या अवयदानामुळे इतरांना जीवनदान मिळून त्यांच्या कुटुंबियांना आनंदाचे दिवस येणार आहेत.

बीड जिल्ह्यातील पहिले अवयवदानबीड जिल्ह्याच्या इतिहासात संपूर्ण अवयवदान करणारा युवक म्हणून बाबू गोविंद ढवळे याचे नाव अजरामर राहणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी नेत्रदान झालेले आहे, मात्र अवयवदान झाल्याची ही पहिलीच घटना आहे. धसवाडीसारख्या ग्रामीण भागातील ढवळे कुटुंबियांनी अवयवदानाचा मोठा निर्णय घेतला.

सर्वच अवयव कामीबाबू  तरूण असल्याने त्याच्या शरीरातील सर्वच अवयव इतरांसाठी कामाचे ठरले. ससून रुग्णालय प्रशासनाने त्याचे नेत्र, हृदय, किडनी, लिव्हर, फुफ्फुस, त्वचा व इतर अवयव दान करण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दानhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरAccidentअपघात