शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Rain in Beed, Ashti: पावसाचे रौद्ररूप : आष्टी तालुक्यात अनेक तलाव ओव्हर फ्लो, नदी नाल्यांना रात्रीत पूर; गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 11:59 IST

महसुल विभागाचे नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले

अविनाश कदम आष्टी ( बीड ) : पावसाअभावी दरवर्षी टंचाईचा सामना करणा-या आष्टी तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला असून मुसळधार पावसाने रात्रीत नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.काही गावांचा संपर्क तुटला आहे.धामणगांव हायवे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.जोरदार पावसाने शेतक-यांचे होत्याचे नव्हते झाले पिकांचे अतोनात नुकसान झाले असून महसूल विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तालुक्यातील शनिवारी सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली रात्रभर मुसळधार पावसाने अनेक गावांतील नदी नाल्यांना पूर येऊन तलाव ओव्हर फ्लो झाले तर या जोरदार पावसाचे रौद्ररूप आष्टी तालुक्याने अनुभवले. तालुक्यातील कडी नदी अनेक दिवसांपासून पूराच्या प्रतिक्षेत असलेल्या कडी नदीला पूर आला असून आष्टी शहराला पाणी पुरवठा करणारा ब्रम्हगावचा तलाव ओव्हर फ्लो झाला सुलेमान देवळा येथील नदीला पूर आला आहे. पाणी पुलावरून वाहत आहे तेव्हा सुलेमान देवळा ते सावरगांव या मार्गांवरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रम्हगाव, बेलगांव,निंबोडी,करंजी,क-हेवडगांव, देविनिमगाव,रूटी इमणगाण,कांबळी, गहूखेल,उदखेल,बावी,चोभा निमगांव हे सर्व तलाव एकाच रात्रीत ओव्हर फ्लो होण्याची पहिलीच घटना घडली आहे.अनेक गावातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत.घरांची पडझड झाली आहे.शेतातील पिके पाण्यात गेले असल्याने शेत जलमय झाले या जोरदार पावसाने पाणी साठ्यात वाढ झाली मात्र, उडिद,तुर,कापूस,सोयाबीन,बाजरी,कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.लागवड केलेला कांदा पाण्यात असून जास्त पावसाने जमिनीचे उत्खनन झाल्याने वाहून गेला आहे.काही शेतक-यांचे काढणीला आलेले उडिद,बाजरी पिक ही पाण्यात भिजत असून अतोनात नुकसान झाले आहे.या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आष्टी तालुक्यात मागिल २४ तासापासून सर्वदूर पाऊस सुरू असून,या पावसाने बरेच तलाव ओहरफ्लो झाले आहेत.त्यामुळे सांडव्यावरून पाणी पडून नदीला पाणी आलेले आहे.नागरीकांनी या वाहत्या पाण्यावरून तसेच नदीच्या कडेला न जावू नये,तसेच पाऊस सुरू असल्यास शेतातही शेतीच्या कामासाठी न जाता झाडाखाली थांबू नये व कुठे काही आपत्ती आल्यास 9922842001 या क्रमांकावर संपर्क साधावा -राजाभाऊ कदम ( तहसिलदार आष्टी )

 

कडा,धामणगांव,महसूल मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस 

४ सप्टेंबर रोजी चे महसुल मंडळ निहाय पर्जन्यमान 

आष्टी - ८७.१ कडा  - १२६.५टाकळसिंग - २.३दौलावडगांव - ७७.८धामणगांव  - ११९.६धानोरा  - ६८.६पिंपळा  - ८०.३

टॅग्स :Rainपाऊस