लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनमानी करत अनागोंदी कारभार करत आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातील मूलभूत प्रश्नासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. परंतु, नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवत बीडकरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ घाई गडबडीत सर्वसाधारण सभा आटोपली, असा आरोप आघाडीचे गटनेते फारु क पटेल यांनी केला आहे.नगराध्यक्षांच्या एकाधिकारीशाही विरोधात यापूर्वीही तक्रारी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. चार वर्षापासून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात महापुरु षांचे पुतळे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जिवा महाले व लोकमान्य टिळक यांच्यासह इतर महापुुरूषांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. हे पुतळे लवकरात लवकर बसवण्यात यावेत. यासह जनतेच्या हिताचे प्रश्न विषय पत्रिकेत घेण्याची मागणी करुनही नगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले, याची चौकशीची मागणी त्यांनी केली.१८ सप्टेंबर रोजी होणाºया पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पत्रिकेत विषय घेण्यासाठी आघाडीच्या वतीने २३ आॅगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. त्यात शहरातील दोन्ही ईदगाह, बालेपीर, पेठबीड येथे सिमेंट कॉंक्र ेट, प्लॅटफार्म व शहेंशावली दर्गा, मन्सूरशाह दर्गा तीर्थ क्षेत्र असल्याने त्याचा आराखडा तयार करु न विकासासाठी पाठविणे, बार्शी रोड ते लेंडी रोड प्रभाग क्र . १४ वरील रस्ता करणे, त्याचबरोबर या भागातील घरांचे पुनर्वसन करणे, विविध योजनेतून निधी खर्च करु न बांधण्यात आलेले वातानुकुलीत भाजी मार्केट, मच्छी मार्केट, बुंदेलपुरा व पेठबीड, न.प.ची इतर मालमत्ता आदी विषय चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी विषय पत्रिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर शहरातील अस्वच्छता, दैनंदिन आठवडी बाजार याचा विकास करणे व इतर मूलभूत प्रश्नासंदर्भातही निवेदनात मागणी करण्यात आली. परंतु, नगराध्यक्षांनी या मागणीस केराची टोपली दाखवली. त्यामुळे यासर्व प्रकाराची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली असून पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये प्रशासनातला अधिकारी निरीक्षक म्हणून देण्यात यावा, अशी मागणीही जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आल्याचे पटेल यांनी सांगितले.
बीडच्या नगराध्यक्षांची मनमानी; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 00:05 IST
नगर परिषदेचे नगराध्यक्ष मनमानी करत अनागोंदी कारभार करत आहेत. काकू-नाना विकास आघाडीच्या नगरसेवकांनी शहरातील मूलभूत प्रश्नासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषय घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. परंतु, नगराध्यक्षांनी केराची टोपली दाखवत बीडकरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ घाई गडबडीत सर्वसाधारण सभा आटोपली, असा आरोप आघाडीचे गटनेते फारु क पटेल यांनी केला आहे.
बीडच्या नगराध्यक्षांची मनमानी; मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष
ठळक मुद्देगटनेते पटेल यांचा आरोप : विविध विषयांना दिली बगल