शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

मांजरा धरण ओव्हरफ्लो! दोन दरवाजे उघडुन विसर्गास सुरुवात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 09:20 IST

मागील आठवड्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले २६ लहान-मोठे तलाव व १४ बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली होती. 

- अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई-:  बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प आज रविवारी (दि.१६ ) सकाळी तुडुंब भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या कालव्यातून १४.९७ क्यूसेक (०.४२४ क्यूमेक्स) वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. त्यानंतर सकाळी 8:00 ते  9:00 वाजे दरम्यान मांजरा प्रकल्पाचे द्वार क्र. 1 आणि 6 असे एकुण 2 द्वार 25 सेंटिमीटर उंचीवर उघडून मांजरा नदीपात्रात 1747.33 क्युसेक (49.48 क्युमेक्स)  इतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

धनेगाव येथील मांजरा नदीवर सिंचनाच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या मांजरा धरणाची साठवण क्षमता एकूण २२४.०९३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे तर उपयुक्त पाणीसाठा १७६.९६३ दशलक्ष घनमीटर आहे. मांजरा धरणाची एकूण पाणी पातळी ६४२.३७ मीटर आहे.

मागील आठवड्यात मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले २६ लहान-मोठे तलाव व १४ बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मांजरा धरणातही पाण्याची आवक वेगाने सुरू झाली होती.   शुक्रवारी रात्री धरण भरणार असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, मात्र नंतर पाण्याची आवक मंदावली. अखेर आज रविवारी सकाळी ६ वाजता मांजरा धरण १०० टक्के पूर्ण भरले. पाण्याची आवक कमी असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्याऐवजी सकाळी आठ वाजतापासून धरणाच्या उजव्या कालव्यात १४.९७ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. परंतु त्यांनतर सकाळी 8:00 ते  9:00 वाजे दरम्यान मांजरा प्रकल्पाचे द्वार क्र. 1 आणि 6 असे एकुण 2 द्वार 25 सेंटिमीटर उंचीवर उघडून मांजरा नदीपात्रात 1747.33 क्युसेक (49.48 क्युमेक्स)  ईतका विसर्ग सोडण्यात आला आहे.

सतर्कतेचा इशारादरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन पुर नियंत्रण कक्ष, मांजरा धरण यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडManjara Damमांजरा धरण