शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून झालेल्या मांगवडगाव तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 17:27 IST

अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

अंबाजोगाई (जि.बीड) : केज तालुक्यातील मांगवडगाव येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. याप्रकरणी पाच जणांना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा तर आठ जणांची निर्दोष मुक्तता केली. जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयाने बुधवारी ठोठावली. हे तिहेरी हत्याकांड राज्यभर गाजले होते. सचिन मोहन निंबाळकर, हनुमंत उर्फ पिंटू मोहन निंबाळकर, बालासाहेब बाबूराव निंबाळकर, राजाभाऊ हरिश्चंद्र निंबाळकर, जयराम तुकाराम निंबाळकर अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

शेतीचा वाद अनेक वर्षांपासून धुमसत होता. बाबू शंकर पवार यांना २००६ मध्ये या वादातून मारहाण झाली होती. १३ मे २०२० रोजी सांयकाळी बाबू शंकर पवार व त्याचे मुले, सुना असे सर्व जण वादग्रस्त जमिनीवर संसारोपयोगी साहित्यासह ट्रॅक्टरमधून राहण्यासाठी गेले होते. यावेळी सर्व आरोपींनी चिडून त्यांच्यावर शस्त्रासह दगड फेकून प्राणघातक हल्ला केला व ट्रॅक्टर अंगावर घालून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच यावेळी आरोपींनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात बाबू शंकर पवार, संजय बाबू पवार, प्रकाश बाबू पवार या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी दादुली प्रकाश पवार हिचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. मारहाणीमध्ये धनराज बाबू पवार, सुरेश शिवाजी पवार, शिवाजी बाबू पवार, संतोष संजय पवार हे गंभीर जखमी झाले होते. धनराज पवार यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव येथे ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. येथील जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

१६ साक्षीदार तपासलेसरकार पक्षातर्फे ॲड. अशोक कुलकर्णी यांनी सोळा साक्षीदार तपासले. यात जखमी , डॉक्टर, तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी, पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. व्ही. के. मांडे यांनी पाच आरोपींना तिहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर खटला हा आरोपींना कोठडीमध्ये ठेवूनच चालविण्यात आला. ॲड. अशोक कुलकर्णी यांना ॲड. आर. एम. ढेले, ॲड. नितीन पुजदेकर , पैरवी अधिकारी गोविंद कदम, बाबूराव सोडगीर यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीBeedबीड