शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:40 IST

येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे.

बीड : येथील नगर पालिकेच्या मलेरिया विभागात कार्यरत ३८ कर्मचा-यांचे वेतन १८ महिन्यांपासून थकले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने बुधवारपासून नगर पालिकेसमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे.जानेवारी २०१८ पासून या ३८ कर्मचा-यांना मासिक वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबांचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. विनावेतन काम करवून घेण्यासाठी नगर परिषदेने वेठबिगारीचा नवीन अवतार धारण केल्याचे शहरी हिवताप कर्मचारी व कामगार युनियनने म्हटले आहे. शासनाने मागविलेली माहिती न पाठविणे, शासकीय पत्र आणि परिपत्रकांची दखल न घेणे आदी कारणांमुळे कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. पाल्यांचे शिक्षण, आजारांवरील औषधोपचार, दैनंदिन अत्यावश्यक गरजा भागविण्यासाठी कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. या संदर्भात , मुख्यमंत्री , आरोग्य संचालक, आरोग्य विभागातील आयुक्त, जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले असून ठोस निर्णय होईपर्यंत उपोषणातून माघार घेणार नसल्याचे युनियन अध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण, एच.एम. वीर, बी.एस. दहिवाळे, ए. व्ही वागमारे, कॉ. एस.बी. पवार, कॉ. रेंगे, कॉ.आर.आर. मोरे, कॉ.इंगळे, कॉ. शेख शहाबोद्दीन, शेख सत्तार, कॉ. जे. ए. पाटील, कॉ. अशोक जोगदंड आदींनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडEmployeeकर्मचारीagitationआंदोलन