शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

विधवा महिलेचा खून करून आत्महत्येचा बनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:26 IST

गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यामुळे सर्वांना आत्महत्या केल्याचे वाटावे. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देउमापूर येथील घटना : पोलिसांनी तपास करून प्रियकराला ठोकल्या बेड्या

बीड/गेवराई : गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकावला. यामुळे सर्वांना आत्महत्या केल्याचे वाटावे. मात्र, पोलिसांनी शवविच्छेदन करून आलेल्या अहवालानंतर खून करणाऱ्याला बेड्या ठोकल्या. ही घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील उमापूर येथे घडली. हा प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचे सांगण्यात येत असून, मारेकरी हा महिलेचा प्रियकरच असल्याचे समोर आले आहे.अनिता विष्णु तुजारे (२५ रा. वरूळ, ता. शेवगाव, जि. अहमदनगर ह.मु.उमापूर ता.गेवराई) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी अनिताचा विवाह झाला होता. तिचा पती आजारी होता. यातूनच त्याचे निधन झाले. तिला पतीपासून दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. पतीचे निधन झाल्यापासून अनिता ही उमापूर येथे माहेरीच राहत होती. माहेरी आल्यावर गल्लीतीच दत्ता किशन खरात याच्यासोबत तिची ओळख झाली. ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले. त्यानंतर त्यांच्यात संबंध आले. दत्ताही विवाहित असून, तो पाच मुलींचा बाप आहे. सहाव्यांदा त्याची पत्नी गर्भवती असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. पत्नी असतानाही दत्ताने अनितासोबत अनैतिक संबंध ठेवले.हा प्रकार समजल्यानंतर वाद झाले. याबाबत अनिता आणि दत्ताला वारंवार समजावण्यात आले. मात्र, त्यांच्यात सुधारणा झाली नाही. एवढेच नव्हे तर काही काळाने अनिता आणि दत्तामध्येही वाद वाढू लागले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात चांगलेच वाद वाढल्याचे सूत्रांनी सांगितले.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता अनिताचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत घरातच आढळला. ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांना संशय होता. शनिवारी सकाळी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये तिचा गळा आवळल्याचे कारण समोर आले. पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अंत्यसंस्कार पार पडल्यावर मयताच्या भावाला बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर खरा प्रकार समोर आला. याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे करीत आहेत. पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, यापूर्वीही माजलगाव तालुक्यातील शहाजनपूर येथेही पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढून आत्महत्येचा बनाव केला होता. मात्र, पोलिसांनी तपास करुन तो बनाव उघडकीस आणला.चर्चेला मिळाला दुजोरापोलीस उमापूरमध्ये पोहचेपर्यंत नातेवाईकांनी गळफास काढून अनिताला खाली झोपवले होते. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी आल्या. त्यांना संशय आल्याने सपोनि नितीन पगार यांनी याबाबत आपले पथक कामाला लावले. तपासादरम्यान अनैतिक संबंधाची चर्चा कानावर आली. प्रकरण संवेदनशील असल्याने त्यांनी ते संयमाने हाताळले. अंत्यसंस्कार झाल्यावर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यांनी अनिताच्या भावाला बोलावून घेत चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी ऐकलेल्या चर्चेला अनिताच्या भावाकडून दुजोरा मिळाला आणि खूनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांचा संयम आणि कौशल्यपूर्णतेमुळे यातील सत्य बाहेर आले.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसMurderखूनCrime Newsगुन्हेगारी