शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई; आष्टीत स्फोटकांच्या जीपमधून ६५ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 19:46 IST

१० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकजण ताब्यात

- नितीन कांबळे कडा ( बीड) - आष्टी डोईठाण रोडवरील कोहिनी शिवारात स्फोटक वाहतूक करणाऱ्या एका जीपमधून ६५ किलो गांजा जप्त करण्याची कारवाई आज दुपारी आष्टी पोलिसांनी केली. याप्रकरणी पोलिसांनी साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास ताब्यात घेतले आहे.   

मौजे कोहिणी फाटा येथे एका हॉटेलसमोर  स्फोटक वाहतूक करणारी जीप गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना मिळाली. यावरून पोलीस निरीक्षक चाऊस आणि कर्मचारी नायब तहसीलदार शारदा दळवी, सरकारी पंच यांचे पथक कोहिणी फाटा येथे दाखल झाले. येथे एका हॉटेल समोर उभ्या जीपची (क्रमांक एम.एच १६,ए.वाय.६५८६) तपासणी केली असता 65 किलोग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत 6 लाख 51 हजार 700 रुपय आहे. पोलिसांनी गांजा आणि जीप असा 10 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चालक नारायणसिंग गोकुळसिंग गुजर ( रा. भावना.ता.जि.मनसोर मध्यप्रदेश ह.मु. बावी.ता.आष्टी. जि.बीड)  याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलीस अधीक्षक सुनील पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम चाऊस पोलीस निरीक्षक, विजय देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक, शारदा दळवी, नायब तहसीलदार, पोलीस नाईक संतोष दराडे, अमोल ढवळे, राहुल तरकसे, सचिन पवल, रियाज पठाण, सचिन कोळेकर, नितीन बहिरवाल यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड