शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या निषेधार्थ माजलगावात शिथिल काळात व्यापाऱ्यांनी पाळला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 13:07 IST

lockdown in Beed : जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाविरोधात किराणा दुकानदारांचा निषेध

माजलगाव : लोकमानस विचारात न घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन पुकारला आहे अशा भावना शहरातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. याच्या निषेधार्थ सकाळी देण्यात आलेली दोन तासांची सूट किराणा व्यापाऱ्यांनी धुडकावून लावत आज सकाळी दुकाने बंद ठेवली. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा निर्णय लागू केला आहे. या काळात किराणा दुकानदारांना सकाळी ७ ते ९ अशी दोन तासांची सुट देण्यात आली आहे. मात्र, लॉकडाऊनचा निर्णय मनमानी पद्धतीचा असून व्यापार्‍यांना आर्थिक खाईत लोटणारा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे यापूर्वीच अतोनात नुकसान झाले आहे. ८० टक्के दुकानदार हे  किरायाच्या जागेत व्यापार करतात. अशा दुकानदारांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबी विचारात न घेता लॉकडाऊनचा निर्णय लागू करून व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न असल्याच्या भावना माजलगावात व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सकाळी माजलगावात किराणा व्यापाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापार करण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत धुडकावून लावत आपली दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या