शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटींच्या अपहार प्रकरणी माजलगावचे नगराध्यक्ष चाऊस गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:18 IST

कोर्टाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी 

ठळक मुद्देफरार मुख्याधिकारी व लेखापाल यांचे आत्मसमर्पण

माजलगाव : येथील नगर परिषदेमध्ये झालेल्या दीड कोटी रुपयांच्या  अपहार प्रकरणी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना बुधवारी ( दि. ४ )  नगर परिषद कार्यालयातून गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच या प्रकरणातील फरार मुख्याधिकारी व लेखापाल यांनाही ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नगर परिषदेमध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी डिसेंबर २०१९ मध्ये तीन मुख्याधिकारी, लेखापाल व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून यातील आरोपी हे फरार होते. आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास होता परंतु  मागील दोन महिन्यांपासून यातील आरोपी सापडत नव्हते. मात्र, यातील एक मुख्याधिकारी हरिकल्यान येलगट्टे यांनी बीड येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सकाळी ११ वाजेच्या दरम्यान माजलगाव नगर परिषद कार्यालायातून नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना ताब्यात घेतले. दरम्यान लेखापाल अशोक कुलकर्णी (वांगीकर) यांनीही आत्मसमर्पण केले. तिघांनाही दुपारी ४ वाजेच्या सुमारास न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पी.ए. वाघमारे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, सहाल चाऊस यांना अटक झाल्यानंतर येथील शहर पोलीस ठाण्यात तसेच न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीArrestअटक