शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात अवैध प्रवासी वाहतूकदाराकडून बसच्या चालक- वाहकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 11:40 IST

कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.  

माजलगाव (बीड ) : सर्व प्रवासी बसमध्ये बसल्याने स्वतःची गाडी रिकामी राहिल्याने एका अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याने रागाच्या भरात बस अडवून चालक आणि वाहकास मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. १८ )  सकाळी घडली. यानंतर मारहाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी करत चालक वाहकांनी शिवाजी चौकात बस आडव्या लावत रास्तारोको आंदोलन केले.  

माजलगाव बसस्थानाकातून सकाळी आठ वाजता आनंदगाव गाडी बाहेर पडत असताना रस्त्यात घायाळ नामक व्यक्तीने त्याची दुचाकी आडवी लावली होती. हॉर्न वाजवूनही तो गाडी बाजूला घेत नसल्याने वाहक सुमंत वाघ यांनी खाली उतरून दुचाकीस्वारास गाडी बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र, घायाळ ने त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या श्रीमुखात भडकावली. हा प्रकार पाहताच चालक नवनाथ मुंडे हे तात्काळ खाली उतरले. घायाळ याने त्यांचे कपडे फाडून धक्काबुक्की केली. 

घटनेची माहिती मिळताच आगारातील सर्व वाहक- चालकांनी एकत्र येत शिवाजी चौकात बस रस्त्यावर लावत रास्तारोको आंदोलन केले.  हा प्रकार एक, दिड तासापासून सुरू असल्याने मोठ्याप्रमाणात वाहतूक खोळंबली असून, दुचाकीस्वारावर कारवाई, अटक केल्याशिवाय गाड्या काढणार नसल्याचा पवित्रा वाहक, चालकांनी घेतला आहे.

टॅग्स :state transportएसटीBeedबीडCrime Newsगुन्हेगारी