शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात मतदानावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:40 IST

आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक : कायदा हातात घेणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

बीड : आज सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा आणि सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले, जिल्ह्यातील सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याची तयारी मागील काही दिवसांपूसन सुरु आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये कलम १०७ अन्वे १५३९, कलम १०९ नुसार १३, कलम १०१ नुसार ५६, कलम १४४ नुसार ३०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दोन टप्प्यात करण्यात आली. ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे त्यांच्यावर पहिल्या टप्प्यात व दुसºया टप्प्यात इतरांवर कारवाई करण्यात आली. ही जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेने पार पडली आहे.सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. ३४ ठिकाणे ही संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे पोद्दार म्हणाले.संवेदनशील केंद्रांवर जास्तीचा बंदोबस्तजिल्ह्यात ३४ मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आले असून त्याठिकाणी जास्तीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर्षी ६ सीआरपीएम तुकड्या त्यामध्ये प्रत्येकी ९० ते १०० जण असणार आहेत. पोलीस कर्मचारी १९१०, पोलीस उपअधीक्षक १०, पोनि २९, पोउपनि १५९, होमगार्ड २२०५ सुरक्षेसाठी असणार आहेत. दरम्यान काही ठिकाणी फिरते पथक व तपासणी पथक देखील कर्तव्य बजावणार आहे.सोशल मीडियावर करडी नजरसोशल मीडियावर प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यासाठी एक विशेष सेलची निर्मिती करण्यात आली असून, आक्षेपार्ह पोस्ट किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारी तसेच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे संदेश पाठवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.विविध कारवायाआचारसंहिता घोषित झाल्यापासून ७ लाख ८३५ रुपये रोख रक्कम पकडण्यात आली आहे. तसेच ५ ठिकाणी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.अवैध शस्त्र बाळगणाºया ४ जणांवर कारवाई केली आहे. तसेच ३५० जणांवर अवैध दारू विक्री केल्याप्रकणी गुन्हा दाखल करुन ९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.१३ लाख १८ हजार रुपयांचा गुटखा, ५ लाख ६० हजार रुपयांचा गांजा, १ लाखाचे रॉकेल पकडले आहे.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Beed S Pपोलीस अधीक्षक, बीडPoliceपोलिस