शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण नरमले; शेतकऱ्यांकडून सकाळी अधिकाऱ्यांना घेराव, दुपारनंतर वीज पुरवठा सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 19:18 IST

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला

- नितीन कांबळे कडा ( बीड) : कसलीही पूर्व सूचना न देता महावितरणने थकीत वीजबिलापोटी टाकळी अमिया येथील सबस्टेशनवरून पाच गावांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. याविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज  सकाळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यामुळे नरमलेल्या महावितरणाने आज दुपारनंतर तत्काळ वीज पुरवठा सुरळीत  केला. 

आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशनवरून रूईनालकोल, सराटेवडगांव, नांदा, टाकळी अमिया, चोभानिमगाव या गावांना वीजपुरवठा होतो. थकीत बिलापोटी महावितरणाने या गावातील वीज पुरवठा चार ते पाच दिवसांपासून खंडीत केला. सध्या पेरणीचे दिवस आहेत. तर काही ठिकाणी पेरणी झालेली आहे. यामुळे गहु, ज्वारी, कांदा, हरभरा आदी रब्बी पिके धोक्यात आली. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज सकाळी टाकळी अमिया येथील ३३ के.व्ही.सबस्टेशन गाठले. अधिकाऱ्यांना घेराव घालत शेतकऱ्यांनी जाब विचारला.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महावितरण नरमले असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.  आंदोलनात ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. राम बोडखे, डाॅ.शिवाजी शेंडगे, अमोल शितोळे, पिनु चौधरी, सावता ससाणे, मधुकर गिर्हे, अशोक चौधरी, शिवाजी भवर, अशोक एकशिंगे, श्रीरंग चौधरी, तात्यासाहेब नालकोल, आजिनाथ नालकोल, पांडुरंग धोंडे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आधीच खरीप हंगाम अतिवृष्टीने हातच गेला आहे. आता रब्बी हंगामाकडे शेतकरी आस लावून आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीBeedबीडmahavitaranमहावितरण