शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"भयमुक्त परळीसाठी निवडणूक लढणार"; धनंजय मुंडेंना रासपच्या नेत्याचे विधानसभेसाठी आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 16:41 IST

''धनंजय मुंडेंच्या विरोधात 'मविआ'ने मला तिकीट द्यावे''; रासपच्या माजी युवा प्रदेशाध्यक्षाने परळीत केली मागणी

परळी (बीड) : गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत गेल्या १३ वर्षापासून काम करीत असलेले रासपाचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातून आव्हान दिले आहे. तशी घोषणा फड यांनी आज पत्रकार परिषदेतून केली. आपण कसल्याची प्रकारे माघार घेणार नसल्याचेही फड यांनी जाहीर केले. 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव मुंडे बहीण-भावाच्या जिव्हारी लागला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला आहे. यामुळे परळी विधानसभेतून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे लढणार हे स्पष्ट आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात मुंडे बहीण भाऊ लढले. मात्र, यावेळी पंकज मुंडे विधानसभा लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आणि रासपचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी फड यांनी आगामी परळी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली आहे. फड पुढे म्हणाले, बारामतीच्या धर्तीवर परळीचा विकास आणि भयमुक्त परळी करण्यासाठी नागरिकांच्या इच्छे खातर आपण परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहोत. महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक असल्याचे सरपंच राजेभाऊ फड यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीला तिकीट मागणारतसेच याबाबत आपण महाविकास आघाडीचे सर्व नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे, नाना पटोले यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मागणार आहोत. परळी मतदार संघाची परिस्थिती, लोकांच्या भावना आपण त्यांना सांगणार आहोत. आपण या निवडणुकीत उभा टाकण्यावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही किंवा कोणाच्याही दबावाला भिणार नाही असा निर्धारही राजेभाऊ फड यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024NCPराष्ट्रवादी काँग्रेस