शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचे शक्तीपीठ योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ; दर्शनासाठी भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 15:42 IST

सलग दोन वर्षानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यावर्षी खुल्या वातावरण नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांची ही गर्दी वाढू लागली आहे.

अंबाजोगाई ( बीड) : महाराष्ट्राचे शक्तीपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास आज सकाळी ९ वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर व त्यांचे पती नवीन केल्लोड यांनी  योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. सलग दोन वर्षानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर यावर्षी खुल्या वातावरण नवरात्र महोत्सव साजरा होत असल्याने भाविकांची ही गर्दी वाढू लागली आहे.

२६ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर  या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला. या महापुजेसाठी योगेश्वरी देवीचे मुख्यपुजारी सारंग पुजारी, योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, विश्वस्त राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, भगवानराव शिंदे, माजी आ. पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, डॉ. संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम  कुलकर्णी, यांच्यासह पुरोहित,  मानकरी व भाविक उपस्थित होते. 

यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. महाआरती नंतर भाविकांची योगेश्वरी च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज दुपारी मंदिर परिसरात देवळा हनुमान महिला भजनी मंडळ, रेणुकाचार्य महिला भजनी मंडळ, आर्यवैश्य महिला भजनी मंडळ, जागृत महिला भजनी मंडळ यांचा संगीतमय भजनाचा कार्यक्रम सादर झाला. तर रात्री मुकुंदराज संस्थानचे प्रमुख ह.भ.प किसनमहाराज पवार यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना मुकुंदराज भजनी मंडळाचे सदस्य साथसंगत देतील. नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव अँड.शरद लोमटे यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडNavratriनवरात्री