शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde : गोपीनाथ मुंडे आज असते तर राजकारणातील सौहार्द टिकून राहिलं असतं : धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 13:51 IST

पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकीला मला त्यांनीच उभे केले अन.., धनंजय मुंडेंनी दिला आठवणींना उजाळा.

परळी : “गोपीनाथ मुंडे हे आज हयात असते तर मागच्या ५-६ वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडले आहेत, ते कदाचित घडले नसते. राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते,” असे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. मी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष सावलीसारखा सोबत राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या काळात देखील मी क्षणोक्षणी सोबत होतो,” असे म्हणत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.  

आज गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी गोपीनाथगडावरील स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे हे सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते, ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला, त्यांचा बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाची प्रगती, ऊस तोड कामगारांचे कल्याण हे स्वप्न उराशी बाळगूनच मी काम करतो आहे. ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापना देखील झाली असून, आता कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न देखील पूर्ण करणार असल्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

“गोपीनाथ मुंडे यांनी माझे वडील, पंडित अण्णा मुंडे यांच्याशी माझ्या जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी साठी अक्षरशः वाद घातला, पण ते स्वतः १९७८ साली लढले. त्याच पट्टीवडगाव गटातून मला उमेदवारी दिली, मी विजयी झालो आणि माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,” अशी आठवण सांगताना धनंजय मुंडे भावुक झाले होते. 

आजही त्यांचा आवाज माझ्या कानात घुमतो...धनंजय मुंडे यांनी सकाळी 'अप्पा आजही तुमचा आवाज माझ्या कानात घुमतो' अशा आशयाचे ट्वीट करून गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली अर्पण केली होती, याबद्दल माध्यमांनी विचारले असता, धनंजय मुंडे म्हणाले, 'होय, सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय देणारा मुंडे यांचा आवाज होता, आम्हाला त्यांनी तीच शिकवण दिली व तीच शिकवण आम्ही अंगीकृत केली, आजही सर्व सामान्य माणसाच्या न्यायासाठीचा त्यांचा तो आवाज माझ्या कानात घुमतो...'

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBeedबीड