शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'बॉलिवूडच्या उभारणीत महाराष्ट्राचं अन् शरद पवारांसारख्या नेत्यांचं मोलाचं योगदान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 18:31 IST

याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते.

ठळक मुद्देमुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे सांगितले. 

परळी : हिंदी चित्रपट सृष्टी उभी करण्यात महाराष्ट्राचेच सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगत परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो असा विश्वास सिने अभिनेते गोविंदा यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते परळीत सपत्नीक आलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा! अभिनेते गोविंदा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 

याप्रसंगी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी  शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते. यावेळी बोलताना मुंबईतील बॉलिवूड उभारण्यात शरद पवार यांचं योगदान असल्याचं ते म्हणाले. बॉलीवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात शरद पवार यांच्यासारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे सांगितले. 

'पूर्वी १९९९ साली गोविंदाजी परळीत आले तेव्हा म्हणाले होते की धनंजय मुंडे हा माणूस मोठा होईल!' प्रभू वैद्यनाथाचे व परळीतील जनतेचे आशीर्वाद घेऊन आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते काम करत आहेत, यावर गोविंदा यांनी 'परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो, असे गौरवोद्गार काढले. 'धनंजय मुंडेजी ने जो सेवा सामान्य लोगो की की है, वह देखकर  उपरवाला उनके साथ है, धनंजय मुंडे जैसे नेता असली जिंदगी के हिरो है' या शब्दात गोविंदा यांनी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

पत्नी सुनीता आहुजा यांच्यासह दुसऱ्यांदा परळीत आलेल्या अभिनेता गोविंदा यांनी २१ वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्याला परळीला आणले होते, आज पुन्हा २१ वर्षांनी परळीत आलो, इथल्या लोकांचे धनंजय मुंडे यांच्यावरील प्रेम पाहून धनंजय मुंडे यांचे व्यक्तिमत्त्व आणखी मोठे होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ना. मुंडे यांच्यासह आ. संजय दौंड, जि. प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, आ. पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख, वाल्मिक अण्णा कराड, सोमनाथ आप्पा हालगे, बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे,  शिवाजी सिरसाट, चंदूलाल बियाणी, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, प.स. सभापती सौ. उर्मिलाताई गित्ते, संगीता ताई तुपसागर, अर्चनाताई रोडे, पल्लवी भोईटे, यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारGovindaगोविंदा