शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महादेव मुंडेंचे खुनी १९ महिन्यांनंतरही मोकाट; अटकेसाठी ग्रामस्थांचा भरपावसात रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 15:21 IST

खूनप्रकरणी आरोपींना अटक न झाल्यामुळे संताप; कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन

परळी : येथील व्यापारी महादेव दत्तात्रय मुंडे यांचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेस १९ महिने उलटले, तरी अद्यापही आरोपी मोकाट आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेरच्या ग्रामस्थांनी एकत्र येत २५ जुलै रोजी परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे व त्यांचे नातेवाईकही सहभागी झाले आहेत.

या आंदोलनात कन्हेरवाडी (माहेर) आणि भोपळा (सासर) येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जोरदार पावसातही आंदोलन ठामपणे सुरू ठेवत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. पोलीस प्रशासनाला पूर्वसूचना देत आंदोलनाचा इशारा आधीच देण्यात आला होता. या आंदोलनात मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, विजयसिंह उर्फ बाळा बांगर, रिपाई (खरात गट) चे नेते सचिन खरात, तसेच कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत म्हटले, “महादेव मुंडे खूनप्रकरणातील आरोपींना अटक झालीच पाहिजे. वाल्मीक कराड व त्याच्या टोळीने घडवलेला हा गुन्हा आहे. सर्व प्रकरणाचा संपूर्ण पोलखोल आम्ही करणार आहोत. आम्ही मागे हटणार नाही. धनंजय देशमुख यांनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला. या प्रकरणातील एकही आरोपी सुटू नये, सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

सचिन खरात यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले, या घटनेला जवळपास २० महिने झाले, तरीही आरोपींना अटक झालेली नाही. हे सरकार झोपेत आहे का? पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळाला पाहिजे.”महादेव मुंडे यांच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास संथगतीने सुरू असून, या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून आरोपींना तातडीने अटक करावी, ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती.

टॅग्स :BeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या