शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

लेकींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:12 AM

इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल : औरंगाबाद विभागात बीड दुसऱ्या क्रमांकावर

बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात दुस-या क्रमांकावर आला. जिल्ह्याचा निकाल ८८.२७ टक्के लागला असून, निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे.बारावी परीक्षेसाठी ३७ हजार ८९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पैकी ३७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २३ हजार ८१५ मुलांचा तर १३ हजार ९८० मुलींचा समावेश होता. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानुसार कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिनही शाखांमधून एकूण २३३१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. २० हजार १७६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १० हजार ६९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण ग्रेडमध्ये १६६ असे एकूण ३३ हजार ३६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ८८.२७ टक्के इतका लागला असून विभागात दुसºया स्थानी आहे.कला शाखेचा निकाल ७९.७० टक्केबारावी परीक्षेत जिल्ह्यातून कला शाखेतील १४ हजार ६५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ५२० विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणीत ७ हजार ४५३, द्वितीय ३ हजार ६५२ पास ग्रेडमध्ये ५२ असे ११ हजार ६७७ विद्यार्थी पास झाले. या शाखेचा निकाल ७९.७० टक्के लागला.तालुकानिहाय टक्केवारीं;केज तालुका अव्वलबीड ९२.३७, पाटोदा ९०.५०, आष्टी ८६.९१, माजलगाव ८०.६७, अंबाजोगाई ८१.४६, केज ९३.८२, परळी ७९.५१, धारुर ८५.०२, शिरुर ९१.३६, वडवणी ९१.७१व्होकेशनलचा ७८.३३ टक्के निकालव्होकेशनल शाखेतून १४७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ६४ विद्यार्थी विशेष प्राविण्याने पास झाले.८०२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २८७ विद्यार्थी द्वितीय] ११५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेचा निकाल७८.३३टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल जास्तबीड जिल्ह्यात विज्ञान शाखेतून नोंदीत १९ हजार २५२ पैकी १९ हजार २२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४३७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले.या शाखेत प्रथम श्रेणीत १० हजार ७८४, द्वितीय श्रेणीत ५ हजार ९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पास ग्रेडमध्ये ९० असे १८ हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९५.२१ टक्के लागला आहे.वाणिज्य शाखा ९१ %जिल्ह्यातील २४५२ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून परीक्षा दिली. यात ३१० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत ११३७, द्वितीय श्रेणीत ७६३, पास ग्रेडमध्ये २४ असे २२३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९१.११ टक्के इतका लागला आहे.

टॅग्स :BeedबीडHSC Exam Resultबारावी निकाल