शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीने निष्ठावंत नाराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:13 IST

शरद पवारांचा नवा डाव, आता ज्योती मेटे यांच्या भूमिकेकडे लक्ष

बीड : बीड लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातील निष्ठावंतांचा विरोध डावलून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. सोनवणे यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसंग्रामच्या डॉ. ज्योती मेटे आता काय भूमिका घेणार? त्या अपक्ष लढणार की कोणाचा प्रचार करणार, याबाबत उत्सुकता आहे.

महायुतीकडून अगोदरच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजपने यावेळी विद्यमान खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना बाजूला करत पंकजा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तगड्या उमेदवाराच्या शोधात महाविकास आघाडी होती. बीडची जागा शरद पवार गटाकडे असल्याने अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर काही दिवसांतच शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनीही पवारांची भेट घेऊन आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. डॉ. मेटे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच गुरुवारी बजरंग सोनवणे यांचे नाव जाहीर झाल्याने मेटे समर्थकांना धक्का बसला.

सोनवणे सलग दुसऱ्यांदा रिंगणातबजरंग सोनवणे यांना २०१९ च्या निवडणुकीत खा. शरद पवार यांनी उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा सुमारे १ लाख ६८ हजार मतांनी पराभव केला होता. पराभवानंतर सोनवणे सक्रिय नव्हते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सोनवणे अजित पवार गटात गेले होते. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना गुरुवारी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.

आता मेटेंच्या निर्णयाकडे लक्षशिवसंग्राम नेत्या डॉ. ज्याेती मेटे या लोकसभा निवडणूक लढणार, असे ठामपणे सांगत आहेत. बुधवारी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण लढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मविआकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आता त्या काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. वंचित बहुजन आघाडी त्यांच्या नावाचा विचार करणार की त्या अपक्ष लढणार, याबाबत उत्सुकता आहे.

निष्ठावंतांच्या नाराजीचे काय?बजरंग सोनवणे यांना त्यांच्या केज तालुक्यातूनच विरोध आहे. काही दिवसांपूर्वी केज व अंबाजोगाई तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी, असा ठराव केला होता. सोनवणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केल्याने येथील पदाधिकाऱ्यांनी त्यांना अप्रत्यक्ष विरोध केला होता. आता ठराव घेतलेले पदाधिकारी, कार्यकर्ते सोनवणेंचा प्रचार करणार का, याकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :bajrang sonwaneबजरंग सोनवणेBeedबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४beed-pcबीड