शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

'इन्स्टा'वरून प्रेम जुळले, पण तरुणाच्या मनात काळे होते; अत्याचारानंतर तरुणीस केले ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 15:04 IST

तरुणीचे अश्लील फोटो धाडले तिच्या नातेवाईकांसह मित्रमैत्रिणींना, पुण्याच्या तरुणावर बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड : इन्स्टाग्रामवरील ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन् नंतर प्रेमात झाले. मात्र, तरुणाच्या मनात काही औरच होते. त्याने तरुणीला गोडीगुलाबीने जाळ्यात ओढले अन् अत्याचार केला. शरीरसंबंध व पैशांची मागणी करून तिला ब्लॅकमेल केले. तिने पैसे न दिल्याने तब्बल ५० मित्रमैत्रिणींना अश्लील फोटो पाठवून बदनामी केली.

३१ ऑक्टोबरला शिवाजीनगर ठाण्यात पुण्यातील तरुणावर गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी बीडची रहिवासी असून, शेख शरीफ (रा. सांडस रांजणगाव, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, तिचे इन्स्टावर स्वत:चे अकाउंट आहे. या ॲपद्वारे तिची शेख शरीफशी २०२० मध्ये ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सॲपवरूनही एकमेकांशी बोलत. या ओळखीतून त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला पुण्यात बोलावून एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. तेथे तिला न कळू देता व्हिडिओ बनवला व अश्लील फोटोही काढले. त्याआधारे नंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केली.

आरोपी फरारयाबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून ३१ ऑक्टोबरला विनयभंग, बलात्कार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, पोलीस निरीक्षक केतन राठोड तपास करत आहेेत.

पीडितेच्या आईकडेही पैशांची मागणीआईच्या मोबाइलवर संदेश पाठवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास व शरीरसंबंध न ठेवल्यास बदनामी करीन, अशी धमकी त्याने दिली. त्याने तिचा ई-मेल आयडी घेऊन सर्व मित्र व नातेवाइकांचे मोबाइल नंबर कॉपी करून घेतले. त्यानंतर एक दिवस अश्लील फोटो ४० ते ५० मित्रमैत्रिणींना पाठवून बदनामी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमBeedबीड