शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 11:05 IST

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे

बीड/परळी - बीड जिल्ह्यातील धडाडीचे नेते, माजी आ. विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्या अकाली निधनाने बीड जिल्ह्यासह राज्याची व माझी व्यक्तिगत देखील हानी झाली आहे, मी एक मार्गदर्शक व मित्र गमावले. त्यांचे मराठा आरक्षण, ऊसतोड कामगारांचे प्रश्न यातील योगदान कधीही विसरता येणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विनायकराव मेटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. 

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे. शिवस्मारक समिती, मराठा आरक्षण आदी विषयांमधून मेटे यांनी आपल्यातील नेतृत्व गुण दाखवून दिले होते. केज तालुक्यातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकरावांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून आपले आमदार निवडून आणले, याचा मित्र म्हणून नेहमीच अभिमान वाटायचा. ईश्वर मेटे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावनिक शब्दात धनंजय मुंडे यांनी विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष, माजी आ. विनायकराव मेटे यांचे आज पहाटे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अपघाती निधन झाले होते. मागील अनेक वर्षे तर विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम करत होते. त्यांच्या अकाली निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.रामदास तडस, खासदार वर्धा लोकसभा क्षेत्र.

विनायक मेटे हे चळवळीतल नेतृत्व होत,माझे जवळचे मित्र ते होते,मेटे यांचं निधन हा सर्व महाराष्ट्रासाठी एक मोठा धक्का आहे, एक मोठा नेता आपण गमावला अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिलीरवी राणा, आमदार

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडVinayak Meteविनायक मेटे