शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्राचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 6:25 PM

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका यासह खरीप पिकांचे नुकसान झाले

ठळक मुद्देशेतकरी व इतर संघटनेकडून नुकसान भरपाईची मागणीशासन निर्देशानंतर पंचनामे

बीड : खरीप हंगामाची पिके काढणीला आलेली असताना ऑक्टोबर व त्यापूर्वी झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकरी व इतर संघटनांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केल्यानंतर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, अतिवृष्टीमुळे २ लाख ५५ हजार ८०५ पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका यासह खरीप पिकांचे नुकसान झाले होते. सोयाबीन काढणीला आलेले असताना  अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. तसेच सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे कपाशीसह इतर पिकांचे नुकसान  झाले होते. शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने पंचनामे केले. यामध्ये ११ तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान हे गेवराई, बीड, शिरूर कासार, माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यांत झाल्याचे दिसून येत आहे. तर, पाटोदा, अंबाजोगाई  या तालुक्यांत कमी व परळी, आष्टी, केज तालुक्यांत नुकसान झालेले नसल्याचे पंचनाम्यात दिसून येत आहे. अंतिम अहवालामध्ये काही आकडे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १० हजार प्रतिहेक्टर प्रमाणे अनुदानाची मागणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम देखील वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अनुदानाची वाट ते पाहत आहेत.

९८.५० हेक्टरवर बागायती पिकांचे नुकसान बीड जिल्ह्यात बागायती क्षेत्रापेक्षा जिरायती क्षेत्र जास्त आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले बागायती क्षेत्र हे फक्त ९८.५० हेक्टर असल्याचे पंचनामा अहवालात दिसून येत आहे. त्या नुकसानभरपाईसाठी १८ हजार प्रतिहेक्टर प्रमाणे १७ लाख ७३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, घोषणेप्रमाणे २५ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार असल्यामुळे रक्कम वाढणार आहे. 

पंचनामे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांच्या शेतात अधिकारी, कर्मचारी गेलेलेच नाहीत. नुकसान झालेला एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदरी प्रशासनाने घ्यावी व दिवाळीपूर्वी अनुदा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी- कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीड 

पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. अंतिम अहवाल शासनाला पाठवला जाणार आसून, घोषणेप्रमाणे वाढीव अनुदान रकमेची मागणी केली जाणार आहे. अनुदान येताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. यासाठी कृषी विभाग वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे.- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड 

तालुका   बाधित क्षेत्र   शेतकरी   बीड        ३७६३८     १३५३९३गेवराई     ९१९०४      १०९६५४शिरूर का २२९३३      ५४५०५आष्टी     ०००        ०००पाटोदा     २३९.६५     ९१९माजलगाव ५६३१३.६५  ७२१०३धारूर      २०९५१      ३१५५१वडवणी     २४९७०      ३१५५१केज         ००          ००अंबाजोगाई  ८५६.६०    २१८०परळी वै.     ००         ००एकूण- २५५८०५.७५   ४३२७०३

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीड