शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

बीडमध्ये ८७ छावणीचालकांभोवती कारवाईचा पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये टंचाई काळात चालविलेल्या चारा छावणी चालक संस्थांवर पुन्हा एकदा कारवाईचा फास ...

ठळक मुद्देछावणी व्यवस्थापनात निष्काळजीपणा, अनियमिततेचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात २०१३-१४ मध्ये टंचाई काळात चालविलेल्या चारा छावणी चालक संस्थांवर पुन्हा एकदा कारवाईचा फास आवळला आहे. उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील ८७ छावणी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ वर्षे शांततेत गेल्यानंतर या कारवाईमुळे छावणी चालविणाºया पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या छावणी चालकांकडून सुमारे ३ कोटी ५८ लाख ९४ हजार ३१० रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.२०१२ ते २०१५ या कालावधीत बीड जिल्ह्याला दुष्काळी झळा सहन कराव्या लागल्या. २०१३-१४ या आर्थिक वर्षात ज्या चारा छावण्यांनी छावणी व्यवस्थापन करताना निष्काळजीपणा केला अशा चारा छावणी संस्थांविरुद्ध अनियमितता केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे आणि त्याचबरोबर दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.बीड जिल्ह्यात पाटोदा, आष्टी, शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात छावण्यांना मंजुरी मिळाली होती. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारपासून चारा छावणी चालक व संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करुन दंड वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार तालुकापातळीवर संबंधित तहसीलदारांना गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.या कारणांसाठी होणार कारवाईछावणी परिसरात बॅरिकेटिंग न करणे, जनावरांना बिल्ले न लावणे, पाण्याचा हौद न बांधणे यासह अनियमितता बाळगल्याप्रकरणी कारवाईचे निर्देश. एकूण रकमेवर दंड आकारुन दंडाची नव्याने परिगणना करण्याचे निर्देश छावणीच्या ठिकाणी हौद, बॅरिकेटींग न केल्याबद्दल दिलेल्या मूल्यांकनानुसार किंमत वसूल करणे तसेच बिल्ला न लावल्याने प्रती जनावर ४ रु. प्रमाणे वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बीड तालुक्यातील ११ संस्थाबीड तालुक्यातील पाली येथील तालुका दूध उत्पादक संघ, पालवण येथील यशवंत सेवाभावी संस्था, मांजरसुंबा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, राजुरी येथील गजानन सहकारी साखर कारखाना, स्वामी रामानंद तीर्थ युवामंच पालवण संस्थेच्या इमामपूर व खापर पांगरी तसेच वरवटी येथील धनराज संस्था, पाटोदा बेलखंडी येथील हनुमान महिला सहकारी संस्था, कामखेडा येथील शहबाज सेवाभावी संस्था.आष्टीत ४५ छावण्याआष्टी तालुका दूध उत्पादक व सहकारी संस्था, महेश सहकारी साखर कारखाना, महेश सेवाभावी संस्था, शिराळ, संत तुकाराम कृषी विकास संस्था, हिंगणी, औदुंबर सेवाभावी संस्था टाकळी, संत बाळूदेव सेवाभावी संस्था धानोरा, त्रिमूर्ती सेवाभावी संस्था, चिखली, इंदिरा महिला दूग्ध व्याव. सहकारी संस्था निमगाव बोडखा, गजानन दूग्ध सहकारी संस्था, अंबिका सेवाभावी संस्था, केरूळ, माऊली महिला मंडळ पिंप्री, प्रतिभाताई सेवाभावी संस्था शेरी, जोगेश्वरी सेवाभावी संस्था पारगाव, कपिला दूग्ध सहकारी संस्था, शिवशारदा महिला दूग्ध सहकारी संस्था, जयदत्त सेवाभावी संस्था, चिंचपूर, सूर्यभानबाबा संस्था कºहेवाडी, शिवकृपा दूग्ध संस्था डोंगरगण, लक्ष्मी दूग्ध संस्था भवरवाडी, राजमाता शिक्षण संस्था डोईठाण, शिवसागर महिला ग्रामीण बिगर संस्था, कडा, गुरुदत्त सेवाभावी संस्था, कडा, सम्राट दूग्ध संस्था, खडका, महासती महिला दूग्ध सहकारी संस्था हिंगणी, गणेश दूग्ध संस्था देवळाली यांच्यावर कारवाई होणार आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या आदेशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले.