शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथ गडावरील मेळाव्याकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 00:10 IST

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत.

ठळक मुद्देलोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती : पंकजा मुंडेंच्या भाषणाबद्दल उत्सुकता

परळी : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहेत. दरम्यान माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने राज्याचे लक्ष लागले आहे. यावेळी गोपीनाथ गडावर मुंडे यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी भाजप, शिवसेनेचे नेते येणार असल्याचे सांगण्यात आले.माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बुधवारी दुपारी हेलिकॉप्टरने गोपीनाथगड येथे आगमन झाले. त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. तेथून परळीतील यशश्री बंगल्याकडे आल्या. परळी विधानसभा मतदार संघाचा निकाल घोषित झाल्यानंतर पंकजा मुंडे मुंबईला गेल्या होत्या. त्यानंतर प्रथमच त्या परळीत आल्या. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. गोपीनाथ गडावर बुधवारी पोलीस बंदोबस्त तैनात होता.दरम्यान, पंकजा मुंडे यांनी तुम्ही सारे या...हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे...मी वाट पाहते असे पोस्ट करुन कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले आहे.गोपीनाथ गडावर जय्यत तयारीगोपीनाथ गडावर गोपीनाथराव मुंडेंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाजपचे कार्यकर्ते, भक्त, चाहते हे परळीकडे निघाले आहेत. समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येथे नागरीकांची मोठी गर्दी होणार आहे. त्या अनुषंगाने गोपीनाथ गडावर जय्यत तयारी केली आहे.जयंती निमित्त विनम्र अभिवादानाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. या बॅनरवर गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचे फोटो आहेत.गोपीनाथराव मुंडे यांची जन्मभूमी नाथरा तर कर्मभूमी परळी आहे. ६ वर्षापुर्वी गोपीनाथराव मुंडे यांचे अचानक निधन झाले. त्यानंतरही माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुुंडे, अ‍ॅड. यशश्री मुंडे भगिनींनी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात कार्य सुरूच ठेवले आहे.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे कार्य, त्यांच्या विचाराची प्रेरणा व उर्जा भावी पिढीला मिळावी म्हणून वैद्यनाथ कारखाना परिसरात १२ डिसेंबर २०१४ रोजी गोपीनाथ गडाचे भूमिपूजन झाले तर १२ डिसेंबर २०१५ रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले होते.

टॅग्स :BeedबीडGopinath Mundeगोपीनाथ मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे