शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादीच्या सभेला परवानगी नाकारल्याचा आरोप खोटा - पोलीस अधीक्षक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 14:50 IST

धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर परवानगी नाकारल्याचा केलेला आरोप खोटा ठरल्याचे समोर आले आहे.

बीड : राष्ट्रवादीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, असा आरोप जर कोणी करीत असेल तर तो खोटा आहे. आलेल्या अर्जांप्रमाणे आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीला परवानगी दिलेली आहे. त्याचे पुरावेही माझ्याकडे असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली. त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर परवानगी नाकारल्याचा केलेला आरोप खोटा ठरल्याचे समोर आले आहे.

बीडमध्ये लोकसभा निवडणुकांचे वारे जोराने वाहू लागले आहे. सोमवारी राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे आणि भाजपकडून डॉ.प्रीतम मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बीडमध्ये दोन्ही पक्षाच्यावतीने रॅलीही काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी सोमवारी सकाळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सोमवारी घेण्यात येणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप केला. शिवाय पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यावरही वैयक्तीक टिका केली.

या आरोपाला उत्तर देताना पोलीस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले, राष्ट्रवादीने १९ मार्च रोजी सभेसाठी अर्ज केला. महिला महाविद्यालयासमोरील बागलाने इस्टेटची जागा त्यात निश्चीत केलेली आहे. त्याप्रमाणे त्यांना शिवाजीनगर पोलीस निरीक्षकांनी परवानगी दिलेली आहे. भाजपने २३ मार्च रोजी माने कॉम्प्लेक्स परिसरात सभा घेण्यासाठी अर्ज केला. त्याप्रमाणे त्यांनाही परवानगी दिलेली असल्याचे जी.श्रीधर म्हणाले.

कोणाला कशी दिली परवानगीराष्ट्रवादीचा १९ मार्च रोजी अर्ज आला. त्यांना रॅलीसाठी सकाळी १० ते २ आणि सभेसाठी २ ते ५ अशी वेळ निश्चीत करून दिली. तर भाजपचा २३ मार्च रोजी अर्ज आला. त्यांना रॅलीसाठी दुपारी ३ ते ५ आणि सभेसाठी सायंकाळी ६.३० ते ९.३० अशी वेळ ठरवून देण्यात आलेली आहे.

ऐनवेळी जागा बदलण्याचा घाटराष्ट्रवादीने पहिल्या अर्जात बागलाने इस्टेट हे सभा स्थळ निश्चीत केले होते. त्यानंतर भाजपचा अर्ज आला. त्यांनी माने कॉम्प्लेक्स ही जागा ठरविली. परंतु शनिवारी दुपारनंतर राष्ट्रवादीने जागा बदलून माने कॉम्प्लेक्सच पाहिजे असा घाट घातला. मात्र आगोदरच भाजपला परवागनी दिली असल्याने पोलिसांनी जागा बदलण्यास नकार दिल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडPoliceपोलिस