शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मुंडे भगिनींनी कुटूंबियांसह घेतले प्रभू वैद्यनाथ, गोपीनाथ गडाचे आशीर्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 13:05 IST

डॉ. प्रीतम मुंडे आज भरणार उमेदवारी अर्ज

बीड  : बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप  महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.प्रितम मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी बीडकडे रवाना झाल्या. परळीहून निघण्यापूर्वी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी  कुटुंबियांसह प्रभू वैद्यनाथाचे तसेच गोपीनाथ गडाचे दर्शन घेतले. 

खा. डाॅ. प्रितमताई मुंडे आज दुपारी २ वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी यशःश्री निवासस्थानी त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी त्यांचे औक्षण केले. पालकमंत्री   पंकजा  मुंडे यांच्यासह त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे व लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे गोपीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी प्रज्ञाताई मुंडे ,अमित पालवे , यशश्री  मुंडे सह आ.आर.टी देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दुपारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य  रॅलीचा समारोप माने कॉम्प्लेक्सच्या समोर पारस मैदान येथील प्रचंड जाहीर सभेने होणार असून सभेसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे , ना.पंकजा  मुंडे  मंत्री   राम शिंदे , महादेव जानकर यांच्या सह जिल्ह्यातील सर्व आमदार व भाजपा शिवसेना व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPankaja Mundeपंकजा मुंडेPritam Mundeप्रीतम मुंडेBeedबीड