शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
7
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
8
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
9
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
10
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
11
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
12
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
13
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
14
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
15
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
16
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
17
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
18
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
19
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
20
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?

‘नेटकऱ्यां’चा ‘हायटेक’ प्रचार, अनेक उमेदवारांसाठी ठरतोय धोक्याची घंटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 19:26 IST

सोशल मीडियातून बदनामीच्या पोस्ट होताहेत शेअर  

बीड : सोशल मेडिया प्रभावी व सहज उपलब्ध झालेले माध्यम झाल्यामुळे निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवरांचा प्रचार हा सोशल मीडिया साईटवरुन जोरात सुरु आहे. तसेच ज्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या किंवा चांगल्या कामांचे कौतुक करायचे असेल ते देखील मुक्तपणे करता येत आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या सोशल मीडिया सेलकडून प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी होईल अशा पोस्ट शेयर केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक वेळा प्रचाराची पातळी ही खालावत असल्याचे दिसून येत आहे. 

मात्र, तरी देखील सोशल मीडियाला सुद्धा आचारसंहितेचे नियम लागू आहेत आणि निवडणूक विभाग व इतर संबंधीत विभागांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. चुकीच्या पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर दिसला तर तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. पूर्वीच्या काळी एकमेकांशी थेट बोलून केलेला प्रचार अधिक प्रभावी ठरत असे, त्याला आपण ‘माऊथ टू माऊथ’ असे म्हणतो आणि या प्रचाराचा प्रभाव हा सभेपेक्षा सुद्धा जास्त प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु आजच्या व्यस्त जीवनामध्ये सोशल मीडियाचा वापर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावीपणे मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

अगदी गाव, वाड्या वस्त्यांवरील तरुणांच्या हातात मोबाईल व इंटरनेट पोहचल्यामुळे ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. २०१४ साली देखील सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करण्यात आला मात्र, त्यावेळी इंटरनेट सेवेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता, त्या तुलनेत २०१९ या वर्षात इंटरनेट यंत्रणेचा विस्तार झाला असून गावोगावी मोबाईलसेवा उपलब्ध झाली आहे. 

पूर्वी प्रचाराची साधने हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मर्यादित होती़ आता मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘नेटकरी’ कार्यकर्ते प्रचार पेरणी मोठ्या वेगाने करत आहेत़  त्यामुळे एकाचवेळी अनेकांपर्यंत पोहोचता येणे शक्य होते़  प्रचाराची ही ‘हायटेक’ यंत्रणा अधिक प्रभावी ठरत आहे़ मात्र, असे असले तरी जी हायटेक यंत्रणा प्रचारात उभी आहे ती जिल्ह्याच्या विकासात आली पाहिजे अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे़ 

सोशल मीडियाचा गैरवापर वाढतोयसोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटे देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या माध्यमातून एखाद्या उमेदवाराची बदनामी ही कमी वेळेत मोठ्या प्रमाणात होते. तसेच अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख लपवून फेक अकाऊंटवरुन पोस्ट व इतर मजकूर  टाकून देखील प्रतिस्पर्ध्यांची बदनामी केली जाते, या कामासाठी अनेक राजकीय पक्षांनी मीडिया सेलची निर्मिती केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019