शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘सीएम’ योजनेत पीएमपेक्षा दुप्पट कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:27 IST

राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालल्याने पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर मात्र या योजनेपेक्षा दुप्पट कर्ज देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ८ आॅगस्टपासून सुरु झाली असून उत्पादन आणि सेवा या अंतर्गत उद्योगांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम। बीड जिल्ह्यात २७७ तर राज्यात १० हजार प्रकरणांचे उद्दिष्ट; बेरोजगारांना संधी

बीड : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत चालल्याने पंतप्रधान रोजगार निर्मितीच्या धर्तीवर मात्र या योजनेपेक्षा दुप्पट कर्ज देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ८ आॅगस्टपासून सुरु झाली असून उत्पादन आणि सेवा या अंतर्गत उद्योगांसाठी ५० लाखांपर्यंत कर्ज घेता येणार आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात या योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून राज्यात १० हजार बेरोजगारांना उद्योजक बनण्याची संधी मिळणार आहे.केंद्र सरकारची पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना जिल्हा उद्योग केंद्र, राज्य व केंद्र शासनाच्या खादी ग्रामोद्योगमार्फत राबविली जाते. बीड जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण ११६ प्रकरणांचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. दरम्यान ८ आॅगस्ट रोजी महाराष्टÑ शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केला आहे. या योजनेंतर्गत ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उत्पादन आणि सेवांतर्गत नव्या उद्योगासाठी देण्यात येणार आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात खुल्या प्रवर्गाला २५ टक्के सबसिडी अनुदानाची तरतूद आहे. अनुसुचित जाती, जमातीच्या इच्छुक लाभार्थ्यांसाठी ३३ टक्के सबसिडी आहे.राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असल्याने प्रत्येक जिल्ह्यात ९ ते १० कोटी रुपयांचे कर्जवाटप चालू आर्थिक वर्षात करण्यात येणार आहे. नव्याने उद्योग सुरु करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महाराष्टÑ उद्योजकता विकास मंडळ तसेच एसबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाची यासाठी अट आहे. शहरी बेरोजगारांसाठी जिल्हा उद्योग मंडळ तर ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी खादी ग्रामोद्योग महामंडळामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.अशी प्रक्रिया, असे मिळणार अनुदानमुख्यमंत्री रोजगार निर्मिती रोजगार अंतर्गत या कर्ज योजनेसाठी आॅनलाईन प्रस्ताव आवश्यक सर्व कागदपत्रांसह करावा लागणार आहे. संबंधित बॅँक तसेच जिल्हा उद्योग मंडळ वा खादी ग्रामोद्योग विभागाकडून पूर्व तपासणीनंतर जिल्हाधिकाºयांची समिती कर्ज मंजूर होते. उद्योग सुरु केल्यानंतर पहिल्या वर्षी सबसिडीसाठी मागणी करायची, ती सबसिडी रक्कम बॅँकेत फिक्स डिपॉझिट जमा राहील. तीन वर्ष सातत्याने नियमित उद्योग चालविणाºया लाभार्थ्यांनाच त्यांच्या खात्यात शासनाच्या नियमानुसार सबसिडी जमा होणार आहे. या नियमामुळे केवळ सबसिडी घेण्यासाठी कर्ज घेणाºयांना थारा मिळणार नाही.

टॅग्स :BeedबीडChief Ministerमुख्यमंत्रीBanking Sectorबँकिंग क्षेत्र