शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

२ लाख शेतकरी कर्जमुक्त करणार; मुख्यमंत्र्यांची बीड जिल्ह्यात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त ...

ठळक मुद्दे ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील

लोकमत न्यूज नेटवर्कबीड / वडवणी : भाजप सरकारने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. बीड जिल्ह्यातील २ लाख शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल. त्यासाठी ८०० कोटी रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथे कुंडलिका नदीवर बांधण्यात आलेल्या ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्पाचे जलपूजन, जलवितरण व बंद नलिका प्रणाली कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यानंतर वडवणी शहरात जिल्ह्यातील सर्व सरपंचांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, वडवणीच्या नगराध्यक्षा मंगला मुंडे, आ.विनायक मेटे, आ.आर.टी. देशमुख, आ.भिमराव धोंडे, आ.लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी आ. बदामराव पंडित, केशव आंधळे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ए.पी. कोहीरकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एच.ए.ढंगारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एम.व्ही. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता ए.आर.जाधव, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे फडणवीस म्हणाले, जनतेतून नगराध्यक्ष निवडून दिला जातो तसाच सरपंचही निवडून यावा या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. परंतु विरोधी पक्षाने आम्हाला विरोध केला. हा विरोध मोडून काढत सरपंच थेट जनतेतून निवडला. आज समजले की विरोधी पक्ष का या निर्णयाला विरोध करत होते. याचे उत्तर जिल्ह्यातील ७०३ ग्रामपंचायतींपैकी ४०० ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले. याचीच त्यांना भीती होती. अनेकांनी दावे-प्रतिदावे केले. त्यांना दाखवण्यासाठी व आमचे सरपंच मोजण्यासाठी प्रत्येक सरपंचाला फेटे बांधले आहेत, असेही फडणवीस म्हणाले. मेळाव्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, बाबूराव पोटभरे, संतोष हंगे, डीसीसी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे आदींची उपस्थिती होती.

जादूची कांडी फिरवून जिल्हा परिषदेत सत्ता - पंकजा मुंडेमागील अनेक वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. परंतु या वेळेस आपण जादूची कांडी फिरवली आणि १५ वर्षानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा राहिला. याला व्यासपीठावरील सर्व आमदार साक्षी आहेत. सध्या जिल्ह्यातील चित्र बदलत आहे. पूर्वी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत गेले होते. परंतु आता हेच उलट होत आहे हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे कोणीही गर्वात राहू नये. भाजप नेहमीच एक पाऊल पुढे आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नाही अशी अफवा विरोधकांनी उठवली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु माझे आणि मुख्यमंत्र्यांचे जमत नसते तर आज मी या पदावर नसते, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला. जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २०१५ साली बैठक घेतली. याला मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेचे काम सुरु आहे. मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण होत असल्याने माझ्यासह सर्व बीड जिल्ह्यातील जनतेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने स्वाभिमान जपत कमळाला साथ दिली, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

बंद पाईपलाईनद्वारे पाणी वितरण - गिरीश महाजनपूर्वी प्रत्येक प्रकल्पातून सोडलेले पाणी उघड्या कालव्यातून जात होते. त्यामुळे शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी पोहचताना तब्बल ५० ते ६० टक्के पाण्याचा अपव्यय होतो.हे टाळण्यासाठी राज्यात यापुढे प्रत्येक कॅनॉलद्वारे सोडलेले पाणी बंद पाईपद्वारे जाईल यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रकल्पांमधील उपलब्ध पाण्यांमध्ये जमीन सुजलाम् सुफलाम् करण्याचा आमचा संकल्प आहे.तसेच अरणवाडी, टेंबे, सारणी सांगवी, तांदळवाडी घाट येथील कालव्याचे कामे केली लवकरच पूर्ण केली जातील, असेही गिरीश महाजन यांनी सांगितले. येणाºया सात महिन्यात वडवणी तालुक्यातील शेतकºयांना बंद पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ३१९ कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. यामुळे २८०० हेक्टर शेती सिंचनाखाली येईल असा विश्वासही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.