: कोळगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन
गेवराई : शेतकऱ्यांचे पशुधन ही त्यांची खरी संपत्ती असून तिचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. विविध आजार आणि त्यांना योग्यवेळी उपचार न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. कोळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी या भागात पशुवैद्यकीय दवाखान्याची वारंवार मागणी केली होती. या मागणीचा आपण पाठपुरावा करून ती पूर्ण केली असून शेतकऱ्यांना या पशुवैद्यकीय केंद्राचा लाभ होणार असल्याचे प्रतिपादन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे ३० लक्ष रुपये किमतीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मदनराव घाडगे, राजेंद्र कदम, किशोर पारख, विकास सानप, संतोष जरांगे, नारायण जरांगे, संदीपान दातखिळ, आसाराम बारहत्ते, आबासाहेब करांडे, बिभीषण करांडे, सुरेश जाधव, बबन लोंढे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक, पशुधन मालक उपस्थित होते.
===Photopath===
130321\img-20210313-wa0263_14.jpg
===Caption===
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमीपूजन झाले, त्यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना माजी आ. अमरसिंह पंडित