शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
3
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
4
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
5
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
6
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
7
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
8
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
9
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
10
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
13
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
14
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
15
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
16
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
17
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
18
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
19
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

साहित्यामध्ये जात-पात, धर्माचे रंग नसावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:31 AM

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.दोन दिवस चाललेल्या या ...

ठळक मुद्देमराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा समारोप पंकजा मुंडे यांनी घेतला साहित्यातील राजकारणाचा खरपूस समाचार; स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जात-पात, धर्माचे रंग आल्यामुळे राजकारण बदनाम झाले. परंतु साहित्य क्षेत्रातही हे रंग पाहावयास मिळतात, ही दुर्दैवी बाब होय. जिथे साहित्यातून विचार दिला जातो, तिथे तरी जाती-धर्माच्या भिंती नसाव्यात, असे प्रतिपादन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी केले.

दोन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्षा प्राचार्या डॉ. दीपा क्षीरसागर तर पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, कौतिकराव ठाले, सुशीला मोराळे, नामदेवराव क्षीरसागर, कवयित्री संजीवनी तडेगावकर, भास्कर बडे, डॉ. ऋषिकेश कांबळे, रमेश पोकळे, संतोष हंगे आदी उपस्थित होते.

साहित्य आणि राजकारणातील वाद हा नेहमीच चालत आला आहे. अतिथींची यादी पाहता या संमेलनावरही राजकीय प्रभाव होता. या प्रसंगी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून स्त्री - पुरुष भेदावर चर्चा चालूच आहे. स्त्री मुक्ती, समानता, स्वातंत्र्य यावर बोलले जाते. अनेक महाकाव्यातील कथेचे दाखले दिले जातात. परंतु या महाकाव्यातून बोध दिला जातो तो महत्त्वाचा आहे. स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान राखला तर आपोआपच सर्व प्रश्न सुटतील. त्याची सुरुवात आपण आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे.

आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या स्त्रीला जर प्रत्येकीने शक्ती दिली पाहिजे. स्त्रीचा सन्मान राखत त्यांना मुख्य प्रवाहात बरोबरीने आणने गरजेचे आहे. उद्घाटन समारंभात सुप्रिया सुळे यांनी शासनाच्या ध्येयधोरणावर अप्रत्यक्ष टीका केली होती. शाळा बंद करण्याचा निर्णय हाणून पाडू, असे ठणकावले आणि दुसºया दिवशी संमेलनात मराठी शाळा बंद करू नये, असा ठराव घेतला. हा धागा पकडून त्यांनी साहित्यात येत असलेल्या राजकारणाचा सडेतोड समाचार घेतांना ‘वस्तुस्थिती’ जाणून घेतली पाहिजे असा सल्ला दिला.पटसंख्या कमी असलेल्या शाळाही बंद करु नयेत असा ठराव या संमेलनात घेतला. याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, शाळांच्या संदर्भात चुकीचे गैरसमज पसरविले जात आहेत. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे आणि दुसरी शाळा एक किलोमीटरच्या आत नाही अशा ठिकाणच्या शाळा शासनाने बंद केलेल्या नाहीत.अनाथ मुलांसाठी नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या चांगल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव या संमेलनामध्ये होईल, असे मला वाटले होते. परंतु तसे घडले नाही. हे सांगताना त्यांनी साहित्य क्षेत्रातही कसे राजकारण शिरले आहे, हे अप्रत्यक्षरीत्या उपस्थितांच्या लक्षात आणून दिले.