शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

वस्तीशाळा शिक्षकांच्या निवड यादीत घोळ !

By admin | Updated: July 24, 2014 00:09 IST

बीड : जिल्हा परिषदेने वस्तीशाळा शिक्षकांना नुकतेच कायमस्वरुपी सेवेत सामावून घेत नियुक्ती आदेश दिले; पण या निवड यादीत अनियमितता झाल्याचा सीईओ राजीव जवळेकर यांना संशय आहे़

बीड : जिल्हा परिषदेने वस्तीशाळा शिक्षकांना नुकतेच कायमस्वरुपी सेवेत सामावून घेत नियुक्ती आदेश दिले; पण या निवड यादीत अनियमितता झाल्याचा सीईओ राजीव जवळेकर यांना संशय आहे़ त्यांनी बुधवारी एका लेखी आदेशाद्वारे सर्व गटशिक्षणाधिकाºयांकडून वस्तीशाळा शिक्षकांचा ‘बायोडाटा’ मागवला आहे़ जिल्ह्यात पूर्वीचे ३४७ वस्तीशाळा शिक्षक कार्यरत होते़ जानेवारी २०१४ मध्ये ३०३ शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात आदेश दिले गेले़ विद्यार्थ्यांअभावी १४७ वस्तीशाळा बंद पडल्या होत्या़ त्यापैकी १०९ जणांना आदेश देण्यात आले़ शासनादेशानुसार चालू व बंद वस्तीशाळेवरील एकूण शिक्षकांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेण्यात आले़ एकूण नियुक्त शिक्षकांची संख्या ७५९ वर जाऊन पोहोचली़ डीएड नसलेल्या स्वयंसेवकांना रूजू झाल्यावर पदवी घेण्याची मुभा देण्यात आली आहे़ दरम्यान, काही वस्तीशाळा स्वयंसेवक हे त्यावेळी कार्यरत नव्हते़ ज्येष्ठतायादीतही त्यांचे नाव नाही; परंतु त्यांना नियुक्ती आदेश दिल्याच्या तोंडी तक्रारी प्राप्त झाल्या़ त्यामुळे सीईओ राजीव जवळेकर यांनी सर्व गटशिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून सर्व शिक्षकांची यादी, त्यांच्या शाळा, रुजू दिनांक, प्रवर्ग आदी माहिती मागविली आहे़ याशिवाय सदर स्वयंसेवक यापूर्वी कोठे नियुक्त होते?, रुजू अहवाल, आवश्यक ते सर्व अभिलेखे, वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र आदी माहितीही सादर करण्यास बजावले आहे़ महाराष्ठÑ प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत निवड झालेल्या नवीन शिक्षकांना परिषदेने यापूर्वी दिलेले पत्र, प्रमाणपत्र आदी माहिती मागविली आहे़ दरम्यान, राज्य प्राथमिक वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत आर्सूळ म्हणाले, वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांतील घोळ आता समोर येऊ शकतो़ ज्या शिक्षकांनी तुटपूंज्या मानधनावर अनेक वर्षे काम केले, त्यांना न्याय मिळेल़ ३१ जुलैची ‘डेडलाईन’! सीईओ जवळेकर यांनी गटशिक्षणाधिकाºयांना ३१ जुलै २०१४ पर्यंत वस्तीशाळा शिक्षकांच्या संबधी सर्व माहिती शिक्षण विभागाकडे सादर करण्यास बजावले आहे़ माहिती विलंबाने आल्यास जबाबदारी आपल्यावर राहील, अशी तंबीही जवळेकरांनी दिली आहे़ म्हणे, संचिका असेल़़़! वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाची संचिकाच शिक्षण विभागात उपलब्ध नाही़, असे सूत्रांनी सांगितले़ प्रभारी शिक्षणाधिकारी एस़ वाय़ गायकवाड यांनी, संचिका संबंधित लिपिकाकडे असेल़ माझ्याकडे कशी असू शकते? असा उलट सवाल करुन संचिका जाईल कोठे असे उत्तर दिले़ (प्रतिनिधी) वरिष्ठच चौकशी करतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आऱ आऱ भारती म्हणाले, वस्तीशाळा शिक्षकांच्या नियुक्ती आदेशाची संचिका सामान्य प्रशासन विभागातून गेली नाही़ त्यामुळे नेमके आदेश किती जणांना दिले? हे मी सांगू शकत नाही़ काही नावे परस्पर यादीत घुसविले असतील तर मला माहीत नाही़ वरिष्ठच चौकशी करतील असे त्यांनी सांगितले़